
Google AI Plus Launched : गुगलने भारतात आपला नवीन आणि सर्वात परवडणारा सबस्क्रिप्शन प्लॅन, गुगल एआय प्लस लाँच केला आहे. हा प्लॅन विशेषतः अशा युजर्ससाठी आहे ज्यांना एआय टूल्स वापरायचे आहेत परंतु प्रीमियम सबस्क्रिप्शनचा खर्च टाळायचा आहे. या नवीन प्लॅनसह, वापरकर्त्यांना जेमिनी ३ प्रो, नॅनो बनाना प्रो आणि दरमहा २०० एआय क्रेडिट्सचा फायदा होईल.
गुगल एआय प्लस भारतात पहिल्या सहा महिन्यांसाठी १९९/रुपये महिना दराने उपलब्ध आहे. त्यानंतर ते ३९९/रुपये महिना दराने रिन्यू होईल. या प्लॅनमुळे ग्राहकांना जेमिनी ३ प्रो-पॉवर्ड नॅनो बनाना प्रोचा अॅक्सेस मिळतो, जो व्हिडिओ आणि कंटेंट जनरेशनसाठी वापरला जाऊ शकतो.
याशिवाय, वापरकर्त्यांना फ्लो आणि व्हिस्क अॅपमध्ये दरमहा २०० एआय क्रेडिट्स मिळतील.या योजनेत नोटबुकएलएमचे ऑडिओ ओव्हरव्ह्यूज टूल, गुगल डॉक्स आणि जीमेलमध्ये एआय फीचर्स एकत्रीकरण आणि २०० जीबी क्लाउड स्टोरेज देखील समाविष्ट आहे. तुलनेसाठी, फ्री टियर फक्त १५ जीबी क्लाउड स्टोरेज आणि कमी एआय क्रेडिट्स देते.
गुगलचे महागडे सबस्क्रिप्शन प्लॅन जसे की गुगल एआय प्रो आणि एआय अल्ट्रा अनुक्रमे १,९५०/रुपये महिना आणि २४,५००/ रुपये महिना किमतीत उपलब्ध आहेत.त्याचा प्रो प्लॅन १,००० एआय क्रेडिट्स देतो, तर अल्ट्रा २५,००० क्रेडिट्स आणि ३० टीबी क्लाउड स्टोरेज देतो. गुगल एआय प्लस हा वापरकर्त्यांसाठी सर्वात परवडणारा पर्याय आहे ज्यांना एआय टूल्स आणि क्लाउड स्टोरेजची मूलभूत सुविधा हवी आहे.
गुगल एआय प्लस थेट ओपनएआयच्या चॅटजीपीटी गो सबस्क्रिप्शनशी स्पर्धा करते. चॅटजीपीटी गो भारतात ३९९/रुपये महिना या किमतीत उपलब्ध आहे आणि जीपीटी-५ एआय मॉडेलमध्ये प्रवेश प्रदान करते, परंतु त्यात क्लाउड स्टोरेजचा समावेश नाही.
जर तुम्ही एआय टूल्स, व्हिडिओ आणि कंटेंट निर्मितीसाठी परवडणारे सबस्क्रिप्शन शोधत असाल, तर गुगल एआय प्लस हा एक उत्तम पर्याय आहे. १९९/ रुपये महिना किंमत आणि २०० जीबी क्लाउड स्टोरेज यामुळे ते भारतीय वापरकर्त्यांसाठी विशेषतः योग्य आहे.