'An apple a day keeps doctor away' ही म्हण केवळ म्हणण्यासाठी नाही. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. यात अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण नेहमी लक्षात ठेवा की सफरचंदाचे जास्तीत जास्त पोषण त्याच्या सालीत असते, म्हणून ते सालासकट खा. आज आपण या लेखात जाणून घेऊ की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात.
१.रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्ग टाळण्यास मदत होते.
२.हृदयाला आरोग्यदायी ठेवते
सफरचंदामध्ये सॉल्युबल फायबर असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते.
३. पचनतंत्र सुधारते
सफरचंदामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते. पेक्टिन फायबर पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत करते. ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने पोट साफ राहते.
आणखी वाचा- जाणून घ्या खजुर खाण्याचे १० फायदे; नैसर्गिक साखरेचा उत्तम स्रोत!
४.वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
सफरचंद कमी कॅलरीयुक्त फळ असुन फायबरने परिपूर्ण आहे, ज्यामुळे जास्त काळ भूक लागत नाही. स्नॅक म्हणून सफरचंद खाल्ल्यास अनारोग्यकारक खाण्याची सवय कमी होते आणि वजन नियंत्रित राहते.
५.मधुमेहाचा धोका कमी होतो
सफरचंदाचा लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने त्यातील साखर शरीरात हळूहळू रिलीज होते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहतो. त्यामुळे टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो.
६. मेंदूसाठी फायदेशीर
सफरचंदामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि क्वेरसेटिन मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. हे स्मरणशक्ती सुधारते आणि अल्झायमर आणि डिमेन्शियाचा सारख्या न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजारांचा धोका कमी करते.
७.त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
सफरचंदामध्ये असलेले व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांना मजबूत करतात. हे वृद्धत्वाच्या लक्षणांना कमी करायला मदत करते.
८. हाडे मजबूत बनवतो
सफरचंदामध्ये असलेले बोरॉन आणि कॅल्शियम हाडांची मजबुती वाढवतात. हे विशेषतः महिलांसाठी उपयुक्त आहे.
आणखी वाचा- हिवाळ्यात मुळा खाण्याचे 10 फायदे, कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा रामबाण उपाय
९. कॅन्सरचा धोका कमी होतो
सफरचंदामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
१०.दातांची स्वच्छता
सफरचंद चावून खाल्ल्याने दात आणि हिरड्यांची चांगली स्वच्छता होते. हे दातांवर प्लाक साचू देत नाही आणि तोंडातील दुर्गंध कमी करते.