
Outfits for Goa : गोव्याला बीचवर फिरायला जाताना असे कपडे हवेत जे बोल्ड दिसतील, फोटोत छान येतील आणि उन्हाळ्यात आरामदायकही असतील. हल्ली बिकिनीऐवजी मॅक्सी, मिडी, शॉर्ट सनड्रेस आणि काफ्तानसारखे पर्याय जास्त पसंत केले जातात. कारण हे कपडे बीचपासून कॅफेपर्यंत आणि सनसेट डिनरपर्यंत सहज घालता येतात. कॉटन, लिनेन, रेयॉन आणि शिफॉनसारखे हलके आणि हवा खेळती ठेवणारे फॅब्रिक यासाठी बेस्ट ठरतात. बिकिनी न घालताही तुम्हाला स्टनिंग लूक देणारे काही पर्याय पाहूया.
गोव्यासाठी हा सर्वात क्लासिक आणि इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी परफेक्ट ड्रेस मानला जातो. लांब, वाऱ्यावर उडणारा मॅक्सी ड्रेस बीचच्या वातावरणात खूप सुंदर दिसतो. जर या ड्रेसला साईड स्लिट, स्पेगेटी स्ट्रॅप किंवा ऑफ-शोल्डर पॅटर्न असेल, तर लूक आणखी बोल्ड दिसतो. सूर्यास्ताच्या वेळी आणि बीचवर फोटो काढताना पांढरा रंग खूपच छान दिसतो. यावर फ्लॅट सँडल, सनग्लासेस आणि स्ट्रॉ हॅट घालून तुम्ही तुमचा लूक पूर्ण करू शकता.
दिवसभर फिरायचं असेल, बीचवर चालायचं असेल किंवा कॅफेमध्ये जायचं असेल, तर त्यासाठी शॉर्ट फ्लोरल सनड्रेस बेस्ट आहे. गुडघ्यापेक्षा कमी लांबीचा हा ड्रेस उन्हाळ्यात खूप आरामदायक वाटतो. पीच, पिवळा, निळा, गुलाबी आणि ट्रॉपिकल प्रिंट्स गोव्याच्या वातावरणाला अधिक खुलवतात. दिवसा फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
जर आराम तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असेल, तर काफ्तान ड्रेस नक्की ट्राय करा. हा ड्रेस सैलसर (loose fit) असतो आणि उन्हाळ्यात शरीराला हवा खेळती ठेवतो. गोव्यासाठी ॲबस्ट्रॅक्ट प्रिंट, टाय-डाय किंवा ब्राईट रंगांचे काफ्तान खूप ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही हा ड्रेस बीचवर कव्हर-अप म्हणून किंवा लंच डेटसाठीही घालू शकता.
सनसेट डिनर, बीचवेअर आणि रात्रीच्या फोटोंसाठी वन-शोल्डर ड्रेस खूप ग्लॅमरस दिसतो. एक खांदा उघडा असल्याने लूक नैसर्गिकरित्या बोल्ड दिसतो. जर ड्रेसचं कापड शिफॉन किंवा सॅटिन असेल, तर तो आणखी प्रीमियम फील देतो. सूर्यास्ताच्या बॅकग्राउंडमध्ये हा ड्रेस खूपच आकर्षक दिसतो.
हा ड्रेस कंबरेला स्लिम दाखवतो आणि शरीरावर खूप छान दिसतो. रॅप पॅटर्नमुळे याची फिटिंगही खूप चांगली येते. गोव्याच्या ट्रिपसाठी फ्लोरल किंवा सॉलिड ब्राईट रंगाचा रॅप ड्रेस खूप स्टायलिश दिसतो. यावर सँडल आणि शेल इअररिंग्स (शिंपल्याचे कानातले) घालून तुम्ही स्टाईल करू शकता.
जर तुम्हाला थोडा ट्रेंडी आणि बोल्ड लूक हवा असेल, तर क्रोशे किंवा नेटचा ड्रेस उत्तम पर्याय आहे. हा ड्रेस खूप फॅशनेबल बीच वाईब देतो. या ड्रेसखाली तुम्ही शॉर्ट इनर स्लिट किंवा सायकलिंग शॉर्ट्स घालू शकता, जेणेकरून तुमचा लूक क्लासी आणि आरामदायक राहील.
जर तुम्हाला लांब आणि शॉर्ट ड्रेसच्या मधला पर्याय हवा असेल, तर मिडी कॉटन ड्रेस निवडा. साईट सीइंग, बाजारात फिरण्यासाठी आणि बीच कॅफेसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे. कॉटन किंवा लिनेन फॅब्रिकचा मिडी ड्रेस उन्हाळ्यात सर्वात जास्त आरामदायक असतो.