बाप्पाच्या दर्शनासाठी मित्रपरिवाराला पाठवण्यासाठी आमंत्रण पत्रिकेचे Message

Published : Sep 05, 2024, 12:52 PM ISTUpdated : Aug 27, 2025, 12:28 AM IST

यंदाचा गणेशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 7 सप्टेंबरला घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. अशातच गणशोत्सवावेळी मित्रपरिवाराला बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण पत्रिकेसाठी मेसेज काय असणार हे पाहूया.

PREV
16
गणेशोत्सव 2024

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना सर्वप्रथम गणरायाला वंदन केले जाते. याच गणरायाचा सण गणेशोत्सव यंदा येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या दिवसात गणपतीसोबत जेष्ठा गौरीचे आवाहनही असते. अशातच मित्रपरिवाराला बाप्पाच्या दर्शनासाठी घरी बोलावण्यासाठी पुढील काही आमंत्रण पत्रिकेचे मेसेज पाहा. 

26
गणेशोत्सवाच्या आमंत्रणासाठी मेसेज-1

गणेशोत्सव 2024 सस्नेह आमंत्रण

यंदा आमच्या घरी ….सप्टेंबर ते ….सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे तरीही आपण सहकुटुंब सहपरिवार बाप्पाच्या दर्शनाला यावं हे आग्रहाचं आमंत्रण.

पत्ता-

निमंत्रक-

36
गणेशोत्सवाच्या आमंत्रणासाठी मेसेज-2

II श्री गणेशाय नम: II

सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या घरी गौरी-गणपतीचे आगमन होणार आहे. आपण बाप्पाच्या दर्शनाला येऊन आमचा आनंद द्विगुणित करावा, ही विनंती

पत्ता -

आरतीची वेळ - 

निमंत्रक-

46
गणेशोत्सवाच्या आमंत्रणासाठी मेसेज- 3

गणपती बाप्पा मोरया

दरवर्षी प्रमाणे यंदाही ….. सप्टेंबर दिवशी आमच्याकडे गणरायाचं तर ….. सप्टेंबर दिवशी गौराईचं आगमन होणार आहे. तरीही आपण ऑनलाईन माध्यमातून बाप्पाचा आशिर्वाद घ्यावा ही विनंती!

गौरी पूजन तारीख-

वेळ-

पत्ता -

56
गौरी-गणपती उत्सव

गणपतीला बुद्धीच्या देवतेसह आराध्य दैवत मानले जाते. यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. याशिवाय गणेशोत्सावेळी जेष्ठा गौरीचे आवाहन असते. तीन दिवस गौरीचे पूजन केल्यानंतर गणपतीसोबत विसर्जन केले जाते. 

66
गणपतीचा राज्यात उत्साह

गणेशोत्सवाचा राज्यभरात उत्साह दिसून येत आहे. पुण्यामुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि लहान-मोठ्या गावांमध्येही गणेशोत्सवाची धूम दिसून येत आहे. 

Read more Photos on

Recommended Stories