
Ganesh Chaturthi 2024 : आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाला येत्या 7 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. या दिवसात बहुतांशजण आपल्या घरी अथवा मंडळांमध्ये गणपतीची स्थापना करुन मोठ्या भक्तीभावाने पूजा करतात. अशातच गणोशोत्सावाची मोठी धूम महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पहायला मिळते. गणेशोत्सवावेळी बाप्पासाठी दररोज दहा दिवस वेगवेगळा नैवेद्य तयार केला जातो. या नैवेद्याचेही महत्व आहे. याशिवाय गणेशोत्सादरम्यान जेष्ठा गौरीची देखील पूजा केली जाते. अशातच गौरी-गणपतीला शास्रोक्त पद्धतीने नैवेद्य कसा दाखवावा याबद्दल पुढे जाणून घेऊया सविस्तर..
गणेश चतुर्थीचे महत्व
गणपतीला बुद्धीच्या देवतेसह आराध्य दैवत मानले जाते. यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. याशिवाय पुरणांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यामागील काही कथा सांगितल्या जातात. अशी मान्यता आहे की, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. यामुळेच गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
गणेश चतुर्थी आणि शुभ मुहूर्त
यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीची सुरुवात 6 सप्टेंबर 2024 पासून दुपारी 3 वाजून 01 मिनिटांनी सुरु होणार आहे. ही तिथी 7 सप्टेंबर संध्याकाळी 05 वाजून 37 मिनिटांनी संपणार आहे. यामुळे गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला साजरी केला जाणार आहे. या दिवशी बाप्पाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 03 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता 17 सप्टेंबरला होणार आहे. या दिवशी अनंत चतुर्थी असून बाप्पाला निरोप दिला जातो.
नैवेद्य वाढण्याची शास्रोक्त पद्धत
देवाला नैवेद्य दाखवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे असते. यावेळी नैवेद्यासाठी तयार केलेल्या पदार्थांमध्ये कांदा-लसूणाचा वापर केला जात नाही. शुद्ध आणि सात्विक भोजनाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. अशातच गौरी-गणपतीच्या वेळी शास्रोक्त पद्धतीने नैवेद्य कसा वाढायचा हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ नक्की पाहा.
आणखी वाचा :
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 5 मोदकाचे प्रकार, पाहा रेसिपी
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या पूजेवेळी म्हणा हे 5 स्तोत्र, होईल इच्छा पूर्ण