Gajakesari Rajayoga : दिवाळीपूर्वी गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार होत आहे. यामुळे ३ राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. सणसुदीला या राशीच्या लोकांचे नशिब खुलू शकते.
18 ऑक्टोबरपूर्वी चंद्र आणि गुरुच्या संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होत आहे. 12 ऑक्टोबरला चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. या योगामुळे काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो.
24
कन्या रास
कन्या राशीसाठी गजकेसरी राजयोग करिअर आणि व्यवसायासाठी शुभ ठरू शकतो. तुम्हाला नोकरी-व्यवसायात मोठे यश मिळू शकते. नवीन वाहन किंवा घर खरेदीचा विचार करू शकता. बेरोजगारांना नोकरी मिळेल.
34
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग चांगले दिवस घेऊन येऊ शकतो. हा राजयोग तुमच्या लग्न स्थानी तयार होत आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
वृषभ राशीसाठी गजकेसरी राजयोग शुभ ठरू शकतो. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मार्केटिंग, मीडिया किंवा बँकिंग क्षेत्रात चांगला फायदा होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील.