चला पाहूया सकाळी रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाणे टाळावे.
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कॉफी किंवा कॅफीनयुक्त पदार्थ प्यायल्यास पोटात त्रास होऊ शकतो.
सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने पचनाच्या समस्या होऊ शकतात. तसेच, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी केळी खाणे टाळावे.
सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सकाळी हे पदार्थ खाणे टाळा.
आंबट फळांमध्ये ॲसिड असल्याने, रिकाम्या पोटी खाल्ल्यास ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
सकाळी उठल्याबरोबर तळलेले पदार्थ खाणे देखील पोटासाठी चांगले नाही.
टोमॅटो सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲसिडिटी आणि पचनाच्या इतर समस्या होऊ शकतात.
जास्त साखर आणि कॅलरीज असलेली पेये सकाळी पिणे टाळावे.
Rameshwar Gavhane