५ जुलै २०२६: या ३ राशींसाठी वाईट दिवस, राक्षस योगाचा प्रभाव जाणवणार

Published : Jul 04, 2026, 11:17 PM IST
rashi

सार

५ जुलै २०२६ रोजी कुंभ राशीत ग्रहण दोष कायम राहणार आहे, ज्यामुळे विविध राशींच्या जीवनावर परिणाम होईल. या ग्रहस्थितीनुसार, काही राशींना नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याचे संकेत आहेत, तर काहींना नातेसंबंध आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. या लेखात प्रत्येक राशीसाठी दिवस कसा असेल, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

५ जुलै २०२६ चे राशिभविष्य - या दिवशी ग्रहस्थितीमध्ये बदल होणार नाही. कुंभ राशीत ग्रहण दोष कायम राहील. प्रत्येक राशीसाठी दिवस कसा असेल ते आपण समजून घेऊयात.

१. मेष राशिभविष्य - नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. जर तुम्हाला कोणासोबत व्यवसाय करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे.

२. वृषभ राशिभविष्य - आज काही चांगली बातमी आपलं आयुष्य उजळून टाकेल. जुनी देणी फेडण्यात तुम्हाला दिलासा मिळणार आहे. न्यायालयीन खटले तुमच्या बाजूने लागणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली काम होऊ शकतात.

३. मिथुन राशिभविष्य - स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम होऊ शकतात. तुम्ही तुमच्या सहलीच्या जोडीदारासोबत सहलीचे नियोजन करू शकता. जर तुम्ही प्रेमाच्या नात्यात असाल, तर तुमचे नाते पुढे नेण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे.

४. कर्क राशिभविष्य - आज या राशीचे विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल. पती आणि पत्नीत वाद उद्भवू शकतात. शासकीय काम जर आपले अडले असतील तर ते व्हायला मदत होईल.

५. सिंह राशिभविष्य - नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं घट्ट होऊन जाईल. कायदेशीर बाबींमध्ये दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

६. कन्या राशिभविष्य - जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळेल. कोणालाही अशा काळात पैसे उधार देऊ नका. तुम्हाला वाचण्याची आणि लिहिण्याची आवड निर्माण होऊ शकते.

७. तूळ राशिभविष्य - तुम्ही ऑनलाईन खरेदी करताना सर्वात आधी काळजी घ्या. मित्रांचा सल्ला अशावेळी उपयुक्त ठरणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

८. वृश्चिक राशीभविष्य - कामावर लक्ष देताना तुमचं लक्ष विचलित होऊ शकते. कोणालाही न मागता कोणताही सल्ला देऊ नका. आर्थिक व्यवहार जपून करा. सर्वात आधी व्यवहार करताना काळजी घ्या.

९. धनु राशीभविष्य - आज केलेला प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुमचे प्रेमसंबंध सुधारतील. लोक आज तुमच्या मतांना महत्व देतील. तुमच्या मुलांच्या अभ्यासावर आणि संगतीवर लक्ष द्या.

१०. मकर राशिभविष्य - आपल्या शेजाऱ्यांशी वाद घालू नका. राजकारणात असलेल्यांनी जपून निर्णय घ्या. घरातील वातावरण चांगलं राहील. आपल्या व्यवसायात अडचण येऊ शकते, त्यामुळं आपण काळजी घ्यायला हवी.

११. कुंभ राशिभविष्य - आपल्याला नवीन काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. या दिवशी पती आणि पत्नी यांच्यात वाद होऊ शकतात. कार्यालयातील आपले सहकारी आपल्याला पूर्ण सहकार्य करतील.

१२. मीन राशिभविष्य - पैशाच्या बाबतीत आपण निष्काळजी राहू नका. नवीन काम सुरु करताना ते काही दिवसानानंतर करणे चांगलं राहील. आईच्या आरोग्याची काळजी सर्वात आधी घ्या.

अस्वीकरण - या लेखातील माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेण्यात आली आहे. आम्ही केवळ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहोत. वापरकर्त्यांनी ही माहिती केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावी.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Horoscope 4th July 2026 : आज या 5 राशींना होणार धनलाभ, वाचा आजचे 12 राशींचे राशीभविष्य
Parenting Tips : वडीलांनी चुकूनही मुलाला बोलू नका या 3 गोष्टी, नात्यात येऊ शकतो दुरावा