नवऱ्यासोबत वाद झाल्यास कधीच करू नका या 5 चुका, वाढेल वाद

Relationship Tips : वैवाहिक आयुष्यात नवरा-बायकोमध्ये वाद होतातच. पण एकमेकांना समजून घेत पुढे जाणे फार महत्त्वाचे आहे. अशातच नवरा-बायोकमध्ये वाद झाल्यानंतर कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया...

Chanda Mandavkar | Published : May 22, 2024 7:53 AM IST

Relationship Advice : लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये लहानसहान गोष्टीवरुन वाद होतात. खरंतर, नात्यात वाद-भांडणे होणे सामान्य बाब आहे. पण वादामुळे नाते मोडले जात असेल तर ही चुकीची बाब आहे. अशातच नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया....

जुनी चूक आठवून देऊ नका
नवऱ्यासोबत कधीही भांडण झाल्यास बायकोने कधीच त्याच्या जुन्या चूका आठवून देऊ नये. यामुळे नात्यात वाद अधिक वाढला जाईल. दोघांमधील वाद मिटवायचा असल्यास एकमेकांना समजून घ्यावे. तुमचा राग शांत झाल्यानंतर नवऱ्याशी संवाद साधून वादावर तोडगा काढू शकता.

वाद सोडवण्यासाठी घाई करू नका
काहीवेळेस एखादे भांडण झाल्यानंतर ते मिटवायचे कसे यामागे लागतो. पण यामुळे वाद वाढला जाऊ शकतो. अशातच नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर सर्वप्रथम स्थिती सामान्य होऊ द्या. यानंतर नवऱ्यासोबत शांत बसून संवाद साधा. तुम्ही नक्की कोणत्या गोष्टीवरुन नवऱ्यासोबत नाराज आहात हे देखील त्याच्याजवळ स्पष्ट करा.

सर्वकाही ठिक झालेय याचा दिखावा करू नका
नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर त्यावर तोडगा काढायचा असल्यास मनापासून ते काम करा. यावेळी दिखावा करू नका. जर सर्वकाही ठिक करायचे असल्यास नवऱ्यासमोर खरेपणाने वागा. कारण एखाद्या व्यक्तीला अधिक काळ आपल्या खोट्या भावनांसोबत जगता येत नाही. जर तुम्ही चुकला असाल तर नवऱ्याची माफी मागा. जेणेकरुन नात्यात संवाद पुन्हा आधीसारखा सुरू होईल.

नवऱ्याच्या नातेवाईकांवरुन अपशब्द बोलू नका
बहुतांशवेळा असे होते की, नवरा-बायकोमध्ये वाद झाल्यानंतर एकमेकांच्या नातेवाईकांवरुन अपशब्दांचाही वापर केला जातो. खरंतर, एकमेकांच्या नातेवाईकांना वादामध्ये ओढून भांडण अधिक वाढवू नये. याचा तुमच्या नात्यावरच नव्हे संपूर्ण परिवारावर परिणाम होतो हे लक्षात ठेवा.

पार्टनरला थोडा वेळ द्या
नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर त्याला स्वत:ला सावरण्यासाठी वेळ द्या. यानंतरच पार्टनरने एकमेकांशी शांतपणाने बोलावे. स्थिती ठिक झाल्यानंतर पार्टनरला तुमच्या मनातील सर्वकाही गोष्टी सांगा. जेणेकरुन नात्यात प्रेम कायम टिकून राहिल.

आणखी वाचा : 

मृत मुलीच्या लग्नासाठी जाहिरात, घरातील मंडळी नवरदेवाच्या शोधात

कोणाबद्दल वाईट का बोलू नये? याविषयी काय सांगितले प्रेमानंद महाराजांनी

Share this article