Fashion Tips: उन्हाळ्यात फक्त कॉटनच नाही, ही फॅब्रिक्सही देतील आराम आणि स्टाईल!

Published : Apr 24, 2026, 10:44 PM IST

Fashion Tips: उन्हाळ्यात कपड्यांची निवड खूप महत्त्वाची असते. गरमी, घाम आणि अस्वस्थता यामुळे रोजचं आयुष्य थोडं अवघड होऊन जातं. त्यामुळे बहुतेक लोक कॉटनच्या कपड्यांना पसंती देतात. पण कॉटनशिवाय उन्हाळ्यात आणखी कोणते कपडे घालता येतील, ते इथे जाणून घेऊया.

PREV
17
उन्हाळ्यासाठी योग्य फॅब्रिक्स

उन्हाळा म्हटलं की अनेकांना सर्वात आधी आठवतात ते कॉटनचे कपडे. कॉटन थंड आणि आरामदायक फॅब्रिक आहे हे खरंय, पण तो एकमेव पर्याय नाही. उन्हाळ्यात स्टाईल आणि कम्फर्ट दोन्ही जपायचं असेल, तर इतर फॅब्रिक्सबद्दलही जाणून घेणं गरजेचं आहे. विशेषतः ज्यांना खूप घाम येतो किंवा जे दिवसभर बाहेर फिरतात, त्यांच्यासाठी कॉटनसोबतच इतर काही मटेरियल्स अधिक आरामदायी ठरू शकतात. चला तर मग पाहूया कोणती आहेत ही फॅब्रिक्स.

27
लिनन
लिनन फॅब्रिक खूप हलकं असतं आणि त्यातून हवा सहज खेळती राहते. हे कॉटनपेक्षा थोडं क्रिस्प लूक देतं, त्यामुळे ऑफिस वेअरसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच, घाम लवकर सुकल्यामुळे जास्त वेळ फ्रेश वाटतं. मात्र, लिननला लगेच सुरकुत्या पडतात, ही गोष्ट काहींना आवडत नाही. पण आता बाजारात मिक्स्ड लिनन फॅब्रिक्सही उपलब्ध आहेत.
37
रेयॉन
हे फॅब्रिक सॉफ्ट आणि सिल्कसारखं मुलायम असतं, पण कॉटनप्रमाणे उष्णता अडवून ठेवत नाही. विशेषतः फ्लोई ड्रेस, कुर्ती किंवा टॉप्ससाठी हे खूप आरामदायक आहे. हे कपडे शरीराला चिकटून न बसता थोडे सैलसर असल्यामुळे हवा खेळती राहते. प्रवासादरम्यानही हे फॅब्रिक खूप सोयीस्कर ठरतं.
47
मोडल फॅब्रिक
हा एक असा पर्याय आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. मोडल फॅब्रिक हे नैसर्गिक स्रोतांपासून बनवलेलं एक सेमी-सिंथेटिक मटेरियल आहे. हे खूप मऊ असतं आणि घामही चांगल्याप्रकारे शोषून घेतं. उन्हाळ्यात हे घातल्यामुळे त्वचेला कोणताही त्रास होत नाही. तसेच हे कापड चांगले स्ट्रेचही होते.
57
बांबू फॅब्रिक
बांबू फॅब्रिकलाही आजकाल अनेकजण पसंती देत आहेत. यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे घामाचा वास कमी होण्यास मदत होते. तसेच, हे खूप मऊ असल्यामुळे संवेदनशील त्वचा (sensitive skin) असलेल्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
67
मॉइश्चर-विकिंग (घाम शोषून बाहेर टाकणारे) पॉलिस्टर
अनेकजण समजतात की पॉलिस्टर उन्हाळ्यात आरामदायक नसतं, पण हे पूर्णपणे खरं नाही. जाड पॉलिस्टरऐवजी, हलक्या वजनाचे किंवा मॉइश्चर-विकिंग (घाम शोषून बाहेर टाकणारे) पॉलिस्टर कपडे घातल्यास घाम लवकर निघून जातो. विशेषतः स्पोर्ट्स किंवा वर्कआउटसाठी हे खूप उपयुक्त ठरतं.
77
कपड्यांची डिझाइनही खूप महत्त्वाची
फक्त फॅब्रिकच नाही, तर कपड्यांची डिझाइनही खूप महत्त्वाची असते. सैलसर फिटिंग, हलके रंग आणि साधी कटिंग असलेले कपडे घातल्यामुळे शरीराला गरमी कमी जाणवते. घट्ट फिटिंगचे किंवा गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात, त्यामुळे ते टाळलेलं बरं. तसेच, स्लीव्हलेस किंवा शॉर्ट स्लीव्हजच्या कपड्यांमुळे हवा चांगली खेळती राहते.
Read more Photos on

Recommended Stories