प्रदोष काळात भद्र असल्यामुळे केवळ होळीची पूजा करता येणार, मात्र होळी दहन रात्री ११ नंतर

Published : Mar 24, 2024, 08:11 AM IST
holika dahan

सार

आज संपूर्ण देशभरात होळी साजरी केली जात असून होळी दहनाचा मुहूर्त मात्र रात्री 11 आहे. तर होळीची पूजा तुम्ही सूर्यास्तानंतर करू शकता. ज्योतिषांच्या सांगण्यानुसार असा मुहूर्त 700 वर्षानंतर आला.वाचा सविस्तर नेमकी होळीची पूजा आणि होळी दहन केव्हा करायचं

आज सायंकाळी भद्र असल्याने रात्री 11 नंतर होळी पेटवण्यात येणार आहे. यासाठीच शुभमुहूर्त रात्री 11 वाजल्यापासून सुरु होईल. मुहूर्त रात्री जरी असला तरी होळीची पूजा भद्र काळात केली जात येणार आहे. याकाळात प्रदोष काळ असल्यामुळे सायंकाळी सूर्यास्तानंतर होळीची पूजा करता येणार आहे.

सूर्यास्त झाल्यांनतर पुढील अडीच तास होळीची पूजा करता येऊ शकते. यासाठीच शुभ मुहूर्त 6:24 ते 6:48 असणार आहे. त्याचा वेळी होळी दहनाचा मुहूर्त मात्र रात्री 11:15 ते 12:25 असा असणार आहे. प्रदोष काळात भद्र असल्यामुळे केवळ होळीची पूजा करता येते. होळी दहन करता येत नाही. त्यामुळे होळी दहनाचा मुहूर्त भद्र संपल्यानंतरच असतो.

यंदाच्या होळी दहनाच्या वेळी सर्वार्थसिद्धी, लक्ष्मी, पर्वत केदार ,ज्येष्ठ, अमला, उभयचारी, सरल आणि षष्ठ असा महापुरुषयोग आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार असा योग्य 700 वर्षा नंतर आला आहे. त्यामुळे या मुहूर्तावर होळी दहन केल्याने सर्व समस्या आणि आरोग्य सिद्धी प्राप्त होते. तसेच यामुळे घरात समृद्धी आणि कामात यश मिळेल. त्यामुळे हे मुहूर्त अजिबात चुकवू नये.

कधीपासून सुरू होणार होलाष्टक 2024?

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, यंदा होलाष्टक येत्या 17 मार्चपासून सुरू होणार असून 24 मार्चपर्यंत असणार आहे. याशिवाय 25 मार्चला रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे.

होलाष्टकादरम्यान, कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. जसे की, विवाहसोहळा, नामकरण सोहळा, गृह प्रवेश, साखरपुडा अशी शुभ कार्य होलाष्टकावेळी केली जात नाहीत.

होलाष्टक का अशुभ आहे?

धर्मग्रथांनुसार, राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला अनेक वेळा भक्ती मार्गापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण प्रल्हादने मानले नाही. अशातच हिरण्यकश्यपू संतप्त होत त्याने प्रल्हादचा जीव घेण्याचा विचार केला. यासाठी सातत्याने आठ दिवस प्रल्हादचा जीव घेण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केल असता वेळोवेळी अपयशच हाती आले. याच आठ दिवसांना आजच्या काळात होलाष्टक असे म्हटले जाते. ज्योतिषांनुसार, होलाष्टकादरम्यान ग्रह उग्र होतात. यामुळे होलाष्टकावेळी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य असते.

आणखी वाचा :

Holi 2024 : राशीनुसार या रंगांनी खेळा होळी, आयुष्यात येईल सुख-समृद्धी

Ranga Panchami 2024 : रंगपंचमीच्या रंगांमुळे उद्भवू शकते फुफ्फुसासंबंधित समस्या, अशी घ्या काळजी

Holi 2024 : होळीनिमित्त मित्रपरिवाराला Wishes, Whatsapp Messages, Images आणि शुभेच्छापत्र शेअर करत साजरा करा सण

PREV

Recommended Stories

सुनेला गिफ्ट द्यायला मार्केटमध्ये आल्या सुंदर बांगड्या, डिझाईन पाहूनच पडाल प्रेमात
हिवाळ्यात शून्य मिनिटात पटकन करा गरम, तिळाचे लाडू खाऊन व्हा ताजेतवाने