
मुंबई | प्रतिनिधी सुपरफूड, हेल्दी डायेट आणि सेंद्रिय जीवनशैली यांचा बोलबाला असतानाही अनेक लोक अजूनही हवामानानुसार आहार बदलण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. उन्हाळ्यात काही भाज्या शरीराचं तापमान अधिक वाढवू शकतात, आणि त्यामुळे पित्त, अॅसिडिटी, त्वचेचे त्रास, आणि डिहायड्रेशनसारखे गंभीर त्रास उद्भवू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, उन्हाळ्यात आहार हलका आणि थंड प्रवृत्तीचा असावा. शरीरात पाणी टिकून राहील असे घटक अधिक प्रमाणात घेतले पाहिजेत. जड, उष्ण आणि फॅटयुक्त भाज्या टाळल्या तर उष्माघात, त्वचारोग, डिहायड्रेशन यासारख्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो.
शेंगदाणा चटणी, गरम मसालेदार भाजी, वांगं, गवार, पालेभाज्या (अति प्रमाणात)