Diwali Faral Recipe : दिवाळीसाठी बेसनाचे लाडू तयार करताना लक्षात ठेवा या टिप्स, रेसिपीही नोट करा

Published : Oct 12, 2025, 01:45 PM IST

Diwali Faral Recipe : दिवाळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अशातच यंदाच्या दिवाळीसाठी बेसनाचे लाडू तयार करणार असाल तर काही टिप्स नक्कीच लक्षात ठेवा. अन्यथा लाडूची चव बदलू शकते. तर नोट करा बेसनाच्या लाडूची खास रेसिपी सविस्तर…

PREV
15
साहित्य
  • बेसन (चणा पीठ) – २ कप
  • तूप – १/२ कप
  • साखर किंवा पीठीसाखर – १ १/२ कप (साखरेच्या प्रमाणात चवीनुसार बदल करू शकता)
  • वेलची पूड – १/२ चमचा
  • बदाम / काजू / किसमिस – २-३ चमचे 
25
बेसनाचे पीठ भाजून घ्या
  • कढईत १/२ कप तूप गरम करा.
  • त्यात २ कप बेसनाचे पीठ घाला.यामध्येच पीठीसाखरही घाला.
  • मध्यम आचेवर सतत हलवत बेसनाचे पीट गुलाबी सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजा.
  • बेसन पूर्णपणे भाजल्यावर त्याला वेगळ्या भांड्यात हलके थंड होऊ द्या.
35
वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स
  • बेसन-साखर मिश्रणात १/२ चमचा वेलची पूड टाका.
  • आवडीनुसार कापलेले बदाम, काजू किंवा किसमिस टाका.
  • सर्व मिश्रण नीट मिक्स करा.
45
लाडू वळून घ्या

मिश्रण थोडं थंड झाल्यावर हाताने लहान गोलाकार लाडू तयार करा.यावर काजू लावून त्याची सजावट करू शकता. अशाप्रकारे दिवाळीसाठी चविष्ट असे बेसनाचे लाडू तयार होतील. 

55
लाडू तयार करण्यासाठी खास टिप्स
  • बेसन जास्त भाजल्यास पीठाचा गोडवा हलका कडवट होतो.
  • तूप चांगले गरम करावे आणि मध्यम आचेवर बेसन भाजावे तरच लाडू नीट वळले जातील.
  • वेलची पूड नेहमी थोडीच घालावी, अधिक घालल्यास गोडाचा स्वाद बदलतो.
  • मिश्रण गरम असल्यास लाडू नीट वळले जात नाही, आणि खूप थंड झाल्यास त्याला चिकटपणा कमी होतो.

हे देखील वाचा : 
Diwali Faral Recipe : दिवाळीसाठी तयार करा खमंग असा पोह्यांचा चिवडा, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Read more Photos on

Recommended Stories