
मेष - घरातील मोठ्या माणसांच्या तब्येतीत सुधारणा होईल. मुलांच्या एखाद्या कामामुळे तुमची मान अभिमानाने उंचावेल. आईच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. भावांसोबतचे वाद वाढण्याची शक्यता आहे. आज आध्यात्मिक कार्यात मन रमेल आणि आनंद मिळेल. ऑफिसमध्ये कोणीतरी तुमची फसवणूक करू शकतं, त्यामुळे सावध राहा. घरातील जुने प्रश्न सुटतील. एखाद्या कारणामुळे आज तुमचा अपमान होऊ शकतो. मित्रांवर जास्त विश्वास ठेवणं महागात पडेल. शेजाऱ्यांच्या दबावामुळे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृषभ - कुटुंबातील वाद मिटण्याची दाट शक्यता आहे. जास्त बोलण्यामुळे विनाकारण अडचणी वाढू शकतात. मित्रांच्या बाबतीत थोडं सावध राहा, कारण वाद होऊ शकतात. आईसमान एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. संगीताची आवड असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. शेजाऱ्यांच्या मदतीने व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तुमची खूप दिवसांची एखादी इच्छा आज पूर्ण होईल. कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका.
मिथुन - आज घरी पाहुण्यांची वर्दळ राहील. त्यामुळे तुमचा खर्चही वाढू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमचं नुकसान करू पाहणाऱ्या शत्रूंचा आज पराभव होईल. उच्च शिक्षणाचे प्लॅन्स यशस्वी होतील. परदेशात जाणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. आज प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून थोडं दूर राहिलेलंच बरं. डोळ्यांच्या समस्या तुम्हाला सतावू शकतात. भावांसोबतचे वाद आणखी वाढू शकतात. कोर्ट-कचेरीच्या भानगडींपासून लांब राहा.
कर्क - व्यवसायात आज चांगला नफा होईल, पण तुमची बदनामी होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील टॅलेंट दाखवण्याची उत्तम संधी मिळेल. आज तुम्हाला थोडं एकटं-एकटं वाटू शकतं. घरात पाळणा हलण्याची आनंदाची बातमी मिळू शकते. जुन्या आजारांमधून तुमची सुटका होईल. घरातील वातावरण चांगलं असलं तरी बाहेरचं वातावरण फारसं अनुकूल नसेल. घरातील मोठ्या माणसांना घेऊन बाहेर फिरायला जावं लागेल. उच्च शिक्षणात काही अडचणी येऊ शकतात. रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना काळजी घ्या, अपघात होण्याची शक्यता आहे.
सिंह - आज तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पालकांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. बाहेरच्या भानगडींपासून स्वतःला दूर ठेवा. एखाद्या मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तीची तुम्हाला मदत मिळेल. मित्राच्या अडचणीच्या काळात तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. समाजसेवेत तुमची प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. आज नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात काही समस्या निर्माण होऊ शकतात. पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
कन्या - आज घर असो वा ऑफिस, डोकं शांत ठेवूनच काम करा. परिस्थिती तुमच्या विरोधात जाऊ शकते. पैशांच्या चणचणीमुळे घरात वादविवाद होऊ शकतात. आई-वडिलांसोबतचे तुमचे संबंध चांगले राहतील. आज दिवसभर मन थोडं अस्वस्थ राहील. तुम्हाला नवीन कामाचा शोध घ्यावा लागू शकतो. पैशांच्या बचतीवरून जोडीदारासोबत खटके उडू शकतात. तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे समाजात तुमचा मान वाढेल. मुलांसोबतचे संबंध सुधारतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.
तूळ - सकाळीच व्यवसायाबाबत एखादी चिंता सतावू शकते. नोकरदार वर्गासाठी मात्र आजचा दिवस चांगला आहे. मुलांच्या एखाद्या गोष्टीवरून मन काळजीत राहील. शेजाऱ्यांसोबत वागताना थोडी हुशारी दाखवा. तुमच्यावरील कर्जाचा बोजा वाढू शकतो. आज एखाद्या चांगल्या व्यक्तीशी तुमची ओळख होईल. तुमच्या मनमिळाऊ स्वभावामुळे तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय व्हाल. एखाद्या मालमत्तेच्या देखभालीची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाण्याचा योग आहे. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. पोटाचे आजार बळावण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल. मालमत्तेच्या कारणावरून घरात वाद होण्याची शक्यता आहे. कामात प्रगतीचे योग आहेत. आज तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता, तुम्हाला नक्की यश मिळेल. घरात एखाद्याच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. मुलांसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल. घरातील मोठ्या माणसांच्या आजारपणामुळे तुमची चिंता वाढेल. एखाद्या ठिकाणी तुमचा अपमान होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली असेल तर आज चांगला फायदा होईल.
धनु - आज एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला मदत करावी लागेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस खूप लकी आहे. पण आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. एखाद्या ज्ञानी व्यक्तीसोबत तुमची आध्यात्मिक चर्चा होईल. नवीन घर किंवा बांधकामाच्या कामात अडथळे येऊ शकतात. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनेल. लांब राहणाऱ्या एखाद्या मित्रासोबत तुमचे वाद होऊ शकतात. दिवसभर मनात कसलीतरी भीती राहील. जोडीदारासाठी एखादं खास काम करण्याची संधी तुम्हाला मिळेल.
मकर - मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. गाडी चालवताना मात्र खूप काळजी घ्या. आज एखाद्या कारणामुळे दिवसभर मन उदास राहील. पैसे कमवण्याच्या नवीन संधी मिळतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल. दिवसभर घरात शांतता असली तरी रात्रीच्या वेळी काही अडचणी येऊ शकतात. विनाकारण एखाद्या भानगडीत तुम्ही अडकू शकता. मुलांची चिंता तुम्हाला सतावेल. कामात अजिबात लक्ष लागणार नाही. दिवसभर व्यवसायात चांगली उलाढाल होईल. आज कोणाच्याही वस्तूची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका.
कुंभ - आजारपणामुळे आज तुमचा खूप पैसा खर्च होऊ शकतो. खूप दिवसांपासून ठरलेल्या ट्रिपमध्ये अचानक अडथळे येतील. वैवाहिक जीवनात मात्र आनंद राहील. आज तुम्हाला खर्चावर थोडा कंट्रोल ठेवावा लागेल. शरीरात वेगवेगळ्या आजारांची लक्षणं दिसू शकतात. जोडीदारासोबतचे जुने वाद आज मिटतील. मुलांना चांगली बुद्धी सुचेल. सकाळीच वडिलांसोबत एखाद्या गोष्टीवरून खटके उडू शकतात. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या पार पाडताना काही अडचणींचा सामना करावा लागेल.
मीन - पार्टनरशिपमध्ये एखादं काम करत असाल तर त्यात तुमचं नाव होईल. आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, ते आजारी पडू शकतात. बाहेरच्या वादांपासून स्वतःला लांब ठेवा. एखाद्या मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तीची तुम्हाला मदत मिळेल. मित्राच्या अडचणीच्या काळात तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहावं लागेल. समाजसेवेत तुमची प्रतिष्ठा वाढेल. आज नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात काही समस्या निर्माण होऊ शकतात.