Horoscope 15th March : तूळ-कुंभ राशींसाठी लकी दिवस, वाचा आजचं राशीभविष्य

Published : Mar 15, 2026, 07:44 AM IST

आजचं राशीभविष्य: 15 मार्च, रविवार. आज दिवसभर परिघ, शिव, गद, मातंग आणि सर्वार्थसिद्धी असे 5 शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. या योगांचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. जाणून घ्या, तुमचा आजचा दिवस कसा असेल...

PREV
113
15 मार्च 2026 राशिफल
15 मार्च 2026 रोजी मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, व्यवसायाची नवी योजना तयार होईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र असेल, आर्थिक स्थिती बिघडू शकते. मिथुन राशीचे लोक मोठा निर्णय घेऊ शकतात, कामाचा ताण वाढेल. कर्क राशीच्या लोकांनी मुलांवर लक्ष ठेवावे, सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पुढे जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस. हे पण वाचा- सूर्य ग्रहण 2026: वर्षातील दुसरं सूर्य ग्रहण कधी, भारतात दिसणार का?
213
मेष राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Mesh Rashifal)
या राशीच्या लोकांना मुलांच्या भविष्याची चिंता राहील. जुने कौटुंबिक वाद मिटू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. व्यवसायासंबंधी नवीन योजना बनू शकते. नोकरीत तुमच्या कामात कोणीतरी चुका काढू शकतं. आरोग्याची विशेष काळजी घ्या. हे पण वाचा- सूर्य गोचर 2026: सूर्याच्या राशी बदलामुळे नशीब चमकेल, 4 राशींचा गोल्डन टाइम सुरू
313
वृषभ राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Vrishbha Rashifal)
आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या जाणवू शकते. पैशांवरून कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. मुलांच्या अपयशामुळे मन उदास राहील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीत बदल संभवतो. दिवस संमिश्र असेल.
413
मिथुन राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Mithun Rashifal)
गुंतवणुकीसाठी वेळ तुमच्या बाजूने आहे. कामाचा बोजा अचानक वाढेल. पैशांच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल. दबावाखाली येऊन कोणतेही काम करू नका. लव्ह लाईफमध्ये ग्रह-तारे तुमची साथ देतील. बिघडलेली कामं मार्गी लागतील. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
513
कर्क राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Kark Rashifal)
या राशीच्या लोकांना मेहनतीचा फायदा मिळू शकतो. व्यवसाय आणि नोकरीत तुमचं काम उत्तम राहील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुमची बाजू मजबूत होईल. आज थोडे जास्त व्यस्त असाल. सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
613
सिंह राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Singh Rashifal)
आज जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मामाकडून सहकार्य मिळेल. पण अतिआत्मविश्वास बाळगू नका, नाहीतर नुकसान होऊ शकतं. कायदेशीर बाबींपासून दूर राहा.
713
कन्या राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Kanya Rashifal)
या राशीच्या लोकांवर शत्रू वरचढ होण्याचा प्रयत्न करतील. कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. आज तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. रागाच्या भरात तुम्ही तुमची कामं बिघडवू शकता. मोसमी आजार त्रास देतील. इतरांच्या बोलण्यात अजिबात येऊ नका.
813
तुला राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Tula Rashifal)
या राशीच्या लोकांना आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामं पूर्ण होतील. प्रमोशनसोबत नवीन जबाबदारीही मिळू शकते. ऑफिसमधील वाद मिटू शकतो. गरजेपेक्षा जास्त खर्च करणे टाळा. पोटाचे विकार त्रास देतील.
913
वृश्चिक राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Vrishchik Rashifal)
या राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित एखादी आकर्षक ऑफर मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या वागण्याचं कौतुक होईल. आज जोश आणि होश यांचा समतोल साधण्याची खूप गरज आहे. जमिनीशी संबंधित एखादा फायदेशीर व्यवहार होऊ शकतो. तुम्ही कोणाची तरी मदत कराल.
1013
धनु राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Dhanu Rashifal)
आईच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू शकते. जिथून अपेक्षा आहे, तिथून पैसे मिळणार नाहीत. काम वेळेवर पूर्ण न झाल्याने तुम्ही त्रस्त होऊ शकता. करिअरसाठी हा काळ चांगला आहे. मेहनत करत राहा, त्याचे फळ तुम्हाला नंतर नक्की मिळेल.
1113
मकर राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Makar Rashifal)
तुमची काही रखडलेली प्रकरणं मार्गी लागतील. नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागवू नका. आरोग्याची काळजी घ्या, मोसमी आजार होऊ शकतात. जोडीदाराची साथ मिळेल. फालतू कामांमध्ये वेळ वाया घालवू नका.
1213
कुंभ राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Kumbh Rashifal)
या राशीच्या लोकांच्या प्रमोशनचे योग आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या नवीन कामाची योजना बनवू शकता. थांबलेली कामं पूर्ण झाल्यामुळे आनंद होईल. विद्यार्थी मानसिकदृष्ट्या त्रस्त होऊ शकतात. वादांपासून दूर राहण्यातच तुमचं भलं आहे.
1313
मीन राशिफल 15 मार्च 2026 (Dainik Meen Rashifal)
या राशीच्या लोकांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं. जोडीदारासोबतच्या संबंधात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला आहे. अपचनाचा त्रास होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. खोल पाण्यात जाणे टाळा, अपघाताचे योग आहेत. Disclaimer या लेखात दिलेली माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचनेच्या स्वरूपात घ्यावं.
Read more Photos on

Recommended Stories