Old Sarees to New Designs : जुन्या साड्यांमधून मिळवा भन्नाट नवा लूक.. या डिझाईन्स पाहाल तर जुन्या साड्या फेकून देणार नाही!

Published : Nov 26, 2026, 03:39 PM IST

Old Sarees to New Designs: महिलांच्या वॉर्डरोबमध्ये साड्यांना एक खास जागा असते. आवडीने घेतलेल्या साड्याही एकदा-दोनदा नेसून तशाच कपाटात पडून असतात. पण थोडा कल्पक विचार केला तर या जुन्या साड्यांचा दुसऱ्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. चला पाहूया कसे.

PREV
17
जुन्या साड्यांपासून नव्या डिझाईन्स

कपाटात वर्षानुवर्षे पडून असलेल्या सिल्क, कॉटन किंवा डिझायनर साड्यांना आता जुन्या म्हणून बाजूला काढू नका. लग्न, सण किंवा शुभकार्यासाठी आवडीने खरेदी केलेल्या साड्या काही वेळाच नेसून तसेच ठेवून दिल्या आहेत का? तर मग या आयडियाज तुमच्यासाठीच आहेत.

एका जुन्या साडीपासून तुम्ही सुंदर कुर्ती शिवून घेऊ शकता, मॉडर्न ब्लाऊज डिझाईन करू शकता किंवा घर सजवण्यासाठी पडदे तयार करू शकता. एवढंच नाही तर आजच्या ट्रेंडनुसार हँडबॅग्ज, गाऊन, लेहेंगा अशा विविध नव्या रुपांत त्यांना बदलू शकता.

कमी खर्चात नवे कपडे मिळण्यासोबतच जुन्या आठवणीही जपता येतील. त्याच अनुषंगाने तुमच्या घरात असलेल्या जुन्या साड्यांपासून तयार करता येणाऱ्या सुपर डिझाईन्स कोणत्या आहेत, ते इथे पाहूया.

27
सुंदर कुर्ती आणि सलवार सूट

जुन्या कॉटन किंवा सिल्क साडीपासून सुंदर कुर्ती आणि सलवार सूट शिवता येतो. साडीच्या काठाचा वापर बाह्या, गळा आणि खालच्या भागासाठी केल्यास एक उत्तम डिझायनर लूक मिळतो.

लेहेंगा चोली

हेवी जरी वर्क असलेल्या सिल्क साड्यांचा लेहेंगा बनवता येतो. साडीच्या पदराचा वापर ब्लाऊजच्या डिझाईनसाठी आणि काठाचा वापर लेहेंग्याच्या खालच्या भागासाठी करता येतो. हे लग्न किंवा साखरपुड्यासारख्या कार्यक्रमांसाठी एकदम परफेक्ट सेट होतात.

37
मॅक्सी गाऊन

सॉफ्ट सिल्क, जॉर्जेट, शिफॉन सारख्या साड्यांपासून लांब मॅक्सी गाऊन शिवता येतो. साडीच्या काठाला गाऊनच्या तळाशी जोडल्यास तो दिसायला खूपच आकर्षक दिसतो.

लाँग स्कर्ट

जुन्या साडीपासून सुंदर लाँग स्कर्ट शिवून घेता येतो. कॉटन साड्यांपासून रोजच्या वापराचे स्कर्ट्स आणि सिल्क साड्यांपासून पार्टी वेअर स्कर्ट्स मस्त डिझाईन करता येतात.

47
डिझायनर ब्लाऊज

जुन्या सिल्क साडीच्या पदरावरील सुंदर डिझाईन्स वापरून नवीन मॉडेलचा ब्लाऊज शिवता येतो. हाय नेक, बॅक नेक, एम्ब्रॉयडरी, स्लीव्हलेस अशा अनेक डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता.

दुपट्टा आणि स्टोल

जुन्या साडीचा पदराचा भाग वेगळा कापून सुंदर दुपट्टा म्हणून वापरता येतो. कडांवर लेस किंवा गोंडे जोडल्यास अगदी नवा लूक मिळतो.

57
सुंदर हँडबॅग्ज

जुन्या साडीचा सुंदर काठ आणि पदर वापरून टोट बॅग, हँडबॅग, क्लच बॅग यांसारख्या गोष्टी बनवता येतात. आतमध्ये मजबूत लायनिंगचे कापड लावल्यास त्या बऱ्याच काळासाठी वापरता येतात.

कुशन कव्हर्स

जुन्या साड्यांपासून सोफा किंवा पलंगावर ठेवण्यासाठी सुंदर कुशन कव्हर्स शिवता येतात. विशेषतः सिल्क साडीचा जरीचा काठ आणि पदर कुशनच्या पुढच्या बाजूला वापरल्यास घराला ट्रॅडिशनल लूक मिळतो.

पडदे

जुन्या कॉटन साड्या आणि पातळ शिफॉन साड्यांना खिडकीचे पडदे म्हणून बदलता येते. दोन वेगवेगळ्या रंगांच्या साड्या एकत्र शिवूनही सुंदर पडदे तयार होतात.

67
पोटली बॅग्ज

सिल्क साडीच्या छोट्या तुकड्यांपासून सुंदर पोटली बॅग्ज बनवता येतात. दागिने, गिफ्ट आयटम्स, छोट्या वस्तू ठेवण्यासाठी या मस्त उपयोगी पडतात. सण आणि लग्नसमारंभांनाही तुम्ही या स्टाईलमध्ये सोबत नेऊ शकता.

77
तोरण आणि वॉल डेकोरेशन

साडीचा जरीचा काठ, फुलांचे डिझाईन आणि सुंदर पदर वापरून दारासाठी तोरण, वॉल डेकोरेशन अशा वस्तू बनवता येतात. सणांच्या वेळी या घराची शोभा वाढवतात.

जुन्या साड्या वापरण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

साडी कितीही जुनी असली तरी कापड अजूनही मजबूत आहे का, हे आधी तपासा.

डाग आणि फाटलेले भाग पाहून, फाटलेला भाग बाजूला काढून, चांगल्या कंडिशनमधलेच कापड वापरा.

काठ वाया घालवू नका. नव्या डिझाईनला खरी शोभा साडीचा जरीचा काठ आणि पदरामुळेच येते.

पातळ किंवा ट्रान्सपरंट कापडाने कपडे शिवताना लायनिंग नक्की वापरा.

साडी कापण्यापूर्वी कोणत्या भागात कोणती डिझाईन हवी, हे शिंप्याशी आधीच बोलून घ्या.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories