सर्वात आधी मैदा, दही, मीठ आणि थोडं तेल वापरून कणीक मळून घ्या. हवा असल्यास तुम्ही यीस्टही वापरू शकता. कणीक मऊ होईपर्यंत चांगली मळा. ती जास्त कडक नसावी. थोडी मऊ आणि चिकट असेल तर नान एकदम मऊ होतो.
26
आधीच गार्लिक बटर तयार करून ठेवा
गार्लिक बटर बनवण्यासाठी थोडं बटर वितळवून घ्या आणि त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर मिसळा. ताज्या लसणामुळे नानला मस्त सुगंध आणि चव येते. नान भाजल्यानंतर लगेच लावण्यासाठी हे गार्लिक बटर तयार ठेवा.
36
कणीक मुरू द्या
कणीक मळल्यानंतर लगेच नान बनवू नका. कणीक झाकून ठेवा आणि किमान एक ते दोन तास मुरू द्या. यामुळे कणीक हलकी आणि मऊ होते आणि नान लाटायला सोपं जातं. नान आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होण्यासाठी हा वेळ खूप महत्त्वाचा आहे.
मुरलेल्या कणकेचे छोटे गोळे घ्या आणि ते ओव्हल आकारात लाटा. त्यानंतर एका बाजूला बारीक चिरलेला किंवा ठेचलेला लसूण भुरभुरा आणि हाताने हलका दाबा. यामुळे लसूण नानला व्यवस्थित चिकटतो. नान खूप पातळ न लाटता थोडा जाड ठेवला तर तो मऊ राहतो.
56
गरम तव्यावर भाजा
तवा आधीच चांगला गरम करून घ्या. मग तव्यावर नान ठेवा आणि एक बाजू भाजा. त्यानंतर उलटून दुसरी बाजू भाजा. नानवर सोनेरी रंगाचे डाग आणि थोडा जळलेला भाग दिसला की तो छान लागतो. तंदूरमध्ये भाजल्यासारखे डाग आल्याने नानला हॉटेलसारखी चव येते.
66
शेवटी गार्लिक बटर लावा
तव्यावरून नान काढल्या काढल्या त्यावर तयार केलेलं गार्लिक बटर भरपूर लावा. गरम नानवर बटर लावलं की ते आतपर्यंत मुरतं आणि नान अधिक चविष्ट लागतो. लसूण आणि बटरच्या सुगंधामुळे गार्लिक नान अजूनच भारी लागतो.
या छोट्या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही घरीच तव्यावर मऊ आणि चविष्ट गार्लिक नान बनवू शकता. पनीर बटर मसाला, चिकन करी किंवा मटण करीसोबत गरमागरम खायला दिलात तर घरच्या घरीच हॉटेलसारख्या जेवणाचा आनंद घेता येईल.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.