
Covid 19 Variant : कोविड-19 च्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सतत समोर येत आहेत. आशियाई देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या एका वर्षात भारतात पहिल्यांदाच २५७ सक्रिय कोविड रुग्ण नोंदवले गेले आहेत. कोविडच्या नव्या व्हेरियंटचे नाव LF.7 आणि NB.1.8 आहे. जे JN.1 व्हेरियंटशी संबंधित आहेत. JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण २०२३ च्या अखेरीस समोर आला होता. यामध्ये काही उत्परिवर्तने आहेत जी त्याला वेगाने पसरण्यास आणि रोगप्रतिकारशक्तीला चकवा देण्यास मदत करतात. तथापि, आतापर्यंत असा कोणताही पुरावा मिळालेला नाही की हा जुन्या ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक आहे. अशा परिस्थितीत कोविड-19 JN.1 ची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून बचाव कसा करता येईल हे जाणून घेऊया.
कोविड-19 JN.1 ची लक्षणे ही सामान्य विषाणूजन्य तापा सारखी असतात. घसा खवखवणे, नाक वाहणे, खोकला येणे, तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप आणि थकवा येणे. अनेकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोविड-19 JN.1 जगातील बहुतेक देशांमध्ये आढळला आहे. याचा पहिला रुग्ण २०२३ च्या अखेरीस समोर आला होता. या व्हेरियंटमध्ये ३० उत्परिवर्तने आहेत. ज्यामुळे ते लोकांना लवकर संक्रमित करते. हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. जर भारताचा विचार केला तर हा चक्रीय आजार आहे. म्हणजेच त्याचे रुग्ण दर काही महिन्यांनी वाढतील. हा कालावधी ३-९ महिन्यांपर्यंत असू शकतो. तथापि, हा व्हेरियंट ओमिक्रॉनसारखा जास्त धोकादायक नाही.
कोविड-19 च्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेसाठी मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. वेळोवेळी हात धूत राहा. सॅनिटायझरचा वापर करा. ज्यांना सर्दी-खोकला सारखी लक्षणे आहेत त्यांच्यापासून अंतर ठेवा. ताप, खोकला किंवा घशात दुखत असेल तर घरी राहा आणि गरज भासल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.