मधुमेहाचे रुग्ण मनुक्यांचे सेवन करू शकतात का? वाचा तज्ज्ञांचे मत

Published : May 21, 2025, 08:46 AM ISTUpdated : May 21, 2025, 09:00 AM IST
Dry Raisins

सार

मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या खाण्यापिण्याकडे फार लक्ष द्यावे लागते. अन्यथा ब्लड शुगर वाढल्यास आरोग्यासंबंधित समस्या अधिक उद्भवू शकतात. अशातच मधुमेहाच्या रुग्णांनी मनुक्यांचे सेवन करावे का याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतायत जाणून घेऊया. 

Health Care Tips : मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. डॉक्टरांकडून रुग्णांना काय खावे आणि काय टाळावे, याचे मार्गदर्शन दिले जाते. मात्र काही अन्नपदार्थांबाबत संभ्रम असतो, त्यापैकी एक म्हणजे मनुका. गोड चव असूनही आरोग्यदायी मानल्या जाणाऱ्या मनुकांबाबत मधुमेही रुग्णांमध्ये नेहमीच संभ्रम असतो – "मनुका खाव्यात की नाही?"

तज्ज्ञ काय सांगतात?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मनुका शरीरासाठी फायदेशीर आहेत. यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, आणि अनेक जीवनसत्त्वे असतात, जे शरीराच्या विविध प्रणालींना बळकटी देतात. हाडे मजबूत करणे, पचन सुधारणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, आणि हिमोग्लोबिन वाढवणे – यांसारखे अनेक फायदे मनुकांच्या सेवनाने होतात.

मधुमेहींसाठी मनुका खाणे योग्य आहे का?

डॉ. प्रल्हाद चावला यांच्यानुसार, मधुमेहींनी थेट मनुका खाणे टाळावे. कारण त्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, जे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकते. मात्र, मनुकाचे पाणी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते.

मनुक्याच्या पाण्याचे फायदे

  • हृदयाचे आरोग्य सुधारते
  • हाडे मजबूत होतात
  • पचन सुधारते
  • शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते

तथापि, मधुमेही रुग्णांनी मनुकाचे पाणी घेताना दरवेळी रक्तातील साखरेची पातळी तपासावी, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे सेवन करावे.

मर्यादित प्रमाणातच सेवन करा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चव पुरवण्यासाठी अधूनमधून एखादा- दोन मनुका खाल्ल्यास हरकत नाही, पण नियमित व अधिक प्रमाणात मनुका खाल्ल्यास मधुमेह बिघडण्याचा धोका संभवतो. म्हणूनच, मधुमेही रुग्णांनी मनुका सेवनाबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

हिवाळ्यात पायांचे सौंदर्य वाढवा, निवडा फॅन्सी फ्लॉवर जोडवी डिझाइन
फक्त 3 ग्रॅममध्ये रॉयल नथ! लग्नासाठी बनवा 'हे' स्टायलिश आणि मजबूत डिझाईन्स!