थायरॉईडचे आरोग्य बिघडल्याची कोणती लक्षणे आहेत, ते पाहूया.
जेव्हा थायरॉईड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स तयार करू शकत नाही, तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो.
रात्रभर झोपूनही थकवा जाणवणे, केस गळणे, नियमित काळजी घेऊनही त्वचा कोरडी होणे, स्नायूंमध्ये वेदना आणि सांधेदुखी.
बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्या, जास्त झोप किंवा निद्रानाश, वजन वाढणे, नैराश्य ही हायपोथायरॉईडीझमची लक्षणे असू शकतात.
ही एक अशी स्थिती आहे, ज्यात थायरॉईड ग्रंथी शरीराच्या गरजेपेक्षा जास्त थायरॉईड हार्मोन तयार करते.
भूक लागूनही वजन कमी होणे, जास्त घाम येणे, संध्याकाळी असामान्यपणे गरम वाटणे, चिंता आणि चिडचिड होणे.
वारंवार शौचास होणे, हातांमध्ये कंप जाणवणे, हृदयाचे ठोके जलद किंवा अनियमित होणे, ही देखील याची लक्षणे असू शकतात.
वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच रोगाची पुष्टी करा.
Rameshwar Gavhane