कमर्शियल LPG सिलेंडरच्या दरात तब्बल ₹195.50 ची वाढ झाली आहे. दिल्लीत आता नवीन किंमत ₹2078.50 झाली आहे. घरगुती गॅसचे दर स्थिर असले तरी, पश्चिम आशियातील तणावामुळे भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी कमर्शियल LPG सिलेंडरची किंमत ₹195.50 ने वाढवली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीत १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत आता ₹2078.50 झाली आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक तेल दरातील वाढ हे यामागील मुख्य कारण असल्याचं कंपन्यांनी सांगितलं आहे.
26
घरगुती गॅस सिलिंडर महागणार?
सध्या एक दिलासादायक बातमी म्हणजे, घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या LPG सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत अजूनही ₹913 आहे. पण तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर असेच वाढत राहिले, तर येत्या काही महिन्यांत घरगुती गॅसही महाग होऊ शकतो.
36
कसे वाढतात दर?
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG आणि ATF (विमान इंधन) च्या किमतींचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि डॉलर-रुपया विनिमय दर यावर हे बदल अवलंबून असतात.
पश्चिम आशियातील युद्ध आणि वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, तेलाच्या किमतीत जवळपास ५०% पर्यंत वाढ झाली आहे. भारतासारख्या देशांवर याचा थेट परिणाम होतो, कारण आपण आपल्या ऊर्जेच्या गरजेसाठी आयातीवर अवलंबून आहोत.
56
कर्मशियल एलपीजीचा फटका
कमर्शियल LPG च्या किमती वाढल्याचा थेट फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांना बसतो. यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते, ज्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात. म्हणजेच, येत्या काळात बाहेर जेवण करणं तुमच्या खिशाला थोडं जड जाऊ शकतं.
66
पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल नाही
एक खास गोष्ट म्हणजे, LPG महाग होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सध्या कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल ₹94.72 आणि डिझेल ₹87.62 प्रति लिटरवर स्थिर आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या ₹2 च्या कपातीनंतर हे दर बदललेले नाहीत. आता सगळ्यांच्या नजरा तेल कंपन्यांच्या पुढील बैठकीकडे लागल्या आहेत.