Kitchen Tips : पावसाळ्यात ओलसर झालेली कॉफी पुन्हा येईल वापरता, ट्राय करा या 4 ट्रिक्स

Published : Jun 30, 2025, 03:18 PM IST
Kitchen Tips : पावसाळ्यात ओलसर झालेली कॉफी पुन्हा येईल वापरता, ट्राय करा या 4 ट्रिक्स

सार

Kitchen Tips : पावसाळ्यात ओली झालेली कॉफी फेकायची गरज नाही. कारण ओलसर झालेली कॉफी पुन्हा स्क्रब ते रुम फ्रेशनर म्हणून वापरू शकता. याबद्दलच्याच ट्रिक जाणून घेऊ. 

Moist Coffee Reuse Tricks : पावसाळ्यात कॉफी पावडर किंवा दूध पावडर सुरक्षित ठेवणे खूप कठीण काम असते. जर थोडीशी जरी हवा पावडरमध्ये गेली तर ती घट्ट होते. जर तुमच्या स्वयंपाकघरातील कॉफी घट्ट झाली असेल तर तुम्ही काही सोपे उपाय करून ती पुन्हा वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊया ओली झालेली कॉफी पुन्हा कशी वापरायची.

कॉफी लिक्वीड म्हणून वापरा

जर काचेच्या बाटलीत ठेवलेली कॉफी घट्ट झाली असेल तर तुम्ही ती सहजपणे पुन्हा वापरू शकता. जरी पावसाळ्यात कॉफी घट्ट झाली तरी ती खराब होत नाही. जर तुम्ही ती पुन्हा वापरून कॉफी बनवली तर कॉफीच्या चवीमध्येही काही फरक पडणार नाही. प्रथम गरम पाणी बाटलीत घाला. आता ते काही वेळ तसेच राहू द्या.थोड्यावेळाने कॉफी लिक्वीड रुपात तयार होईल. बाटली थंड झाल्यावर ती फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तुमचा कधी मन होईल किंवा कोल्ड कॉफी बनवायची असेल तेव्हा या लिक्वीड कॉफीचा वापर करू शकता.

स्क्रबचे काम करेल घट्ट कॉफी

तुम्ही जरूर तर घट्ट कॉफी चेहऱ्यावर स्क्रबसारखी वापरू शकता. जर उरलेली कॉफी कमी प्रमाणात असेल तर ती फेकायची नाही तर लोशनमध्ये मिसळून चेहऱ्यावर हलक्या हातांनी लावा. असे केल्याने तुमचा चेहराही स्वच्छ होईल आणि उरलेली कॉफीही वापरली जाईल.

घट्ट कॉफी झाडांमध्ये टाका

कॉफीचे उरलेले अवशेष खत म्हणूनही वापरले जाऊ शकतात. जर घट्ट कॉफी महिन्यांपासून स्वयंपाकघरात ठेवली असेल तर ती फेकायची नाही तर घरातील कुंड्यांमध्ये टाका. यामुळे तुमच्या झाडांना पोषण मिळेल आणि कॉफीही वाया जाणार नाही.

कॉफी रूम फ्रेशनर म्हणून वापरा

जर खोलीतून ओलसरपणा किंवा सिगारेटचा वास येत असेल तर तुम्ही घट्ट कॉफीमध्ये थोडे पाणी टाकून ते रूम फ्रेशनर म्हणून वापरू शकता. असे केल्याने खोलीतील वास दूर होईल आणि उरलेली कॉफीही सहज वापरली जाईल.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

AD Diamond Necklaces च्या ट्रेन्डी डिझाइन्स, लग्नसोहळ्यासाठी एकदम परफेक्ट
Artificial Anklets : पायांचे खुलेल सौंदर्य, ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा पैंजण