६ जुलै २०२६: चंद्र बदलामुळ कुणाचे भाग्य उजळणार? कोणत्या राशीला आहे शुभदिवस

Published : Jul 05, 2026, 11:40 PM IST
The Difference Between Lagna, Rashi, And Nakshatra In Kundli

सार

सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. या चंद्र बदलाचा सर्व १२ राशींच्या जीवनावर काय परिणाम होईल आणि प्रत्येक राशीसाठी हा दिवस कसा असेल, याचे सविस्तर भविष्य या लेखात दिले आहे.

६ जुलै, २०२६ राशीभविष्य: सोमवार, ६ जुलै, २०२६ रोजी चंद्र कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राला मानाचं मानलं जातं. चंद्राच्या राशीबदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. प्रत्येक राशीसाठी हा दिवस कसा असेल ते जाणून घेऊयात.

मेष राशीभविष्य

आज कोणाच्याही वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी घ्या. आपल्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

वृषभ राशीभविष्य

तुमच्या प्रेमसंबंधातील गैरसमज दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मिथुन राशीभविष्य

कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण मदत मिळेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. शासकीय कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

कर्क राशीभविष्य

आज जवळच्या नातेवाईकांशी बोलणं होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या महत्त्वाच्या कामांना महत्व द्या.

सिंह राशीभविष्य

आपला दैनंदिन वेळापत्रक फॉलो करा. नवीन नात्यांमध्ये घाई करू नका आणि आपल्या कुटुंबाचा मान सन्मान राखा. कामामुळे थकवा येऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळं समाधान मिळेल.

कन्या राशी भविष्य

व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. शेअर बाजारात हुशारीने गुंतवणूक करा. अनुभवी लोकांचा सल्ला उपयुक्त ठरणार आहे.

तूळ राशी भविष्य

सरकारी कामातील अडथळे दूर होणार. तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि दिवसभर उत्साही वाटेल. कोणी काही बोललं तर त्यावर स्वतःचे निर्णय घेऊ नका.

वृश्चिक राशीभविष्य

जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस चांगला आहे. तुमचे मन शांत राहील आणि मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील लोकांना फायदा होऊ शकतो.

धनु राशी

जर तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळं काळजी घ्या. सरकारी नियमांकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते.तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

मकर राशीभविष्य

विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात चांगले परिणाम दिसू शकतात. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल, तर खर्च विचारपूर्वक करा. किरकोळ व्यवसायात नफा होईल.

कुंभ राशीभविष्य

कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढा. घरातील वातावरण आनंदी राहील. प्राणायाम आणि योगामुळे मानसिक शांती मिळेल.

मीन राशी भविष्य

तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सपोर्ट मिळेल आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. लोक तुमच्या शांत स्वभावाचे कौतुक करतील. तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.

अस्वीकरण 

या लेखातील माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला ही माहिती देण्यासाठी केवळ एक माध्यम आहोत. वापरकर्त्यांनी ही माहिती केवळ माहिती म्हणून विचारात घ्यावी.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: २ वर्षांच्या चिमुकलीची कमाल! तबल्यावर वाजवले १२ ताल
Jeera Water Benefits : रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिताय?