Gudi Padwa 2024: गुढी पाडव्याला मुंबईतील या पाच ठिकाणीच्या शोभा यात्रा नक्की पहा !

Published : Apr 06, 2024, 02:53 PM IST

प्रत्येक शहराची एक खासियत असते, तशीच मुंबईची देखील आहे. गुढीपाडव्याला मुंबईतील पाच ठिकाणी भव्य शोभा यात्रा निघतात ढोल ताशा पथके तसेच ध्वज पथके आणि पारंपरिक मराठमोळा लुक केलेला असतो. जाणून घ्या कुठे आहेत ते ठिकाण. 

PREV
15
छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर

प्रसिद्ध शिवाजी पार्क रंगीबेरंगी बॅनर, दिवे आणि फुलांनी सजले असते. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मुंबईतील सर्वात भव्य गुढीपाडव्याची मिरवणूक निघते. ज्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

25
गिरगाव

गिरगांव शोभायात्रा पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी होत असते तेथील लेझीम, ढोल-ताशा, पारंपरिक खेळ, रांगोळ्या,बाईक रायडींग, पारंपरिक वेशभूषा हे अनुभवण्यासाठी संपूर्ण परिसराला भेट देऊ शकता. अनेक महाराष्ट्रीय सणांचे केंद्र आणि परिसर म्हणून, गिरगाव ओळखले जाते.

35
मुंबई चौपाटी

गुढीपाडव्याच्या उत्सवासाठी मुंबईतील चौपाटी बीच हे प्रमुख ठिकाण आहे. दरवर्षी हा विशेष सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे येतात.

45
ठाणे

ठाणे शहराजवळील समुदाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित करत सहभागी होतात. जसे गिरगाव शोभायात्रा, डोंबिवली शोभायात्रा निघते तसेच ठाण्यात देखील जास्त प्रमाणात गर्दी होते व ठाणेकर गुडी पाडवा आनंदात उत्सहात साजरा करतात.

55
डोंबिवली गणेश मंदिर (फडके रोड )

डोंबिवलीतील फडके रोड या ढोल ताश्याच्या गजरात भव्य दिव्य शोभायात्रा मध्ये निघते, कल्याण डोंबिवली जवळील शहरातील तरुण तरुणी नवीन मराठी नववर्षाची स्वागत यात्रा मध्ये सहभागी होऊन मराठी पारंपरिक कपडे परिधान करून नवीन वर्ष्याचं स्वागत करतात. 

Recommended Stories