
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्याचा सार ज्या पुस्तकात लिहिला आहे, त्याला आपण चाणक्य नीति म्हणतो. या पुस्तकात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित जीवन व्यवस्थापन टिप्स सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या या गोष्टी जीवनात आणून आपण अनेक समस्यांपासून वाचू शकतो. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या एका नीतिमध्ये अशा ४ कामांबद्दल सांगितले आहे, ज्यात महिला पुरुषांपेक्षा खूप पुढे आहेत. पुढे जाणून घ्या कोणती आहेत ती ४ कामं…
स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा ।
साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥
अर्थ-महिलांमध्ये भूक पुरुषांपेक्षा दुप्पट असते, लज्जा चार पट असते, साहस सहा पट असते आणि कामभाव आठ पट जास्त असतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, एक महिला पुरुषांपेक्षा दुप्पट जेवते. यामागचे एक कारण म्हणजे महिला दिवसभर घरातील कामात व्यस्त असतात तर पुरुष दिवसभर इतकी धावपळ करत नाही. जास्त मेहनत केल्यामुळे महिलांचा आहार पुरुषांपेक्षा दुप्पट असतो.
विद्वानांच्या मते, लज्जा हाच महिलांचा आभूषण आहे. तर पुरुष लज्जा म्हणजेच शरमेच्या बाबतीत महिलांपेक्षा खूप मागे आहेत. महिलांमध्ये लज्जा पुरुषांपेक्षा ४ पट जास्त असते. ही गोष्ट सामान्य गोष्टींवरूनच कळते जसे की महिला कधीही थेट पुरुषाकडे पाहत नाहीत, नेहमी त्यांचे शरीर झाकून ठेवतात.
आचार्य चाणक्य यांचे म्हणणे मानले तर महिलांमध्ये साहस पुरुषांपेक्षा ६ पट जास्त असते म्हणजेच जे काम पुरुष करण्याचा विचारही करू शकत नाहीत, ते काम महिला खूप धाडसाने करू शकतात. अशी अनेक उदाहरणे धर्मग्रंथात भरलेली आहेत जिथे महिलांनी साहसाच्या बाबतीत पुरुषांना मागे टाकले आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, महिलांमध्ये जी चौथी इच्छा पुरुषांपेक्षा जास्त असते ती म्हणजे कामभाव. ही भावना महिलांमध्ये पुरुषांपेक्षा ८ पट जास्त असते पण महिला ती व्यक्त करत नाहीत. संधी मिळाल्यावरच महिलांची ही भावना समोर येते.
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)