माणसाच्या आयुष्यात यश किंवा अपयश एका रात्रीत मिळत नाही. आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या सवयी आपला विचार, नाती, पैसा आणि भविष्य ठरवतात. चाणक्य नीतीनुसार माणसाला विनाशाकडे नेणाऱ्या या ५ सवयी कोणत्या आहेत, ते आज आपण पाहूया.
माणसाची प्रगती फक्त नशिबावर अवलंबून नसते. आपले विचार, निर्णय आणि सवयी भविष्याला आकार देतात. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीमध्ये जगण्याचे नियम आणि विनाशाला कारणीभूत ठरणार्या सवयींबद्दल सविस्तर सांगितलं आहे. या सवयी माणसाचा आदर, पैसा, नाती आणि संधी हळूहळू संपवतात.
26
अति राग
राग आल्यावर माणसाची विचार करण्याची पद्धत बदलते. रागात बोललेले शब्द आणि घेतलेले निर्णय नंतर पश्चात्तापाचे कारण बनतात. चाणक्य नीतीमध्ये आत्मसंयम खूप महत्त्वाचा मानला आहे. छोट्या गोष्टींवर रागवल्याने वर्षानुवर्षांची नाती तुटू शकतात. त्यामुळे कोणतीही अडचण आल्यास लगेच प्रतिक्रिया न देता, शांतपणे विचार करून निर्णय घ्या.
36
अति विश्वास
आयुष्यात कोणावर किती विश्वास ठेवायचा, याचं भान असणं खूप गरजेचं आहे. आपल्या वैयक्तिक गोष्टी, पैशांचे व्यवहार किंवा भविष्यातील प्लॅन्स सर्वांना सांगितल्यास लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. मैत्री किंवा नातं कितीही जवळचं असलं, तरी प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगण्याची गरज नसते, असा इशारा चाणक्य नीती देते.
आयुष्यात संधी चालून आल्यावर ती मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते. पण कामं पुढे ढकलणं, वेळ वाया घालवणं आणि जबाबदारी टाळणं या सवयी प्रगतीत अडथळा ठरतात. तुमच्याकडे कितीही टॅलेंट असलं, तरी मेहनत केली नाही तर यश मिळत नाही. त्यामुळे कोणतंही काम वेळेवर पूर्ण करणं यशासाठी आवश्यक आहे.
56
हाव किंवा अति लोभ
गरजेपेक्षा जास्त पैसा, सत्ता किंवा दुसऱ्याच्या वस्तू मिळवण्याची हाव माणसाला चुकीच्या मार्गावर नेते. प्रगतीची इच्छा असणं स्वाभाविक आहे, पण त्याला मर्यादा नसली की अडचणी सुरू होतात. दुसऱ्यांशी तुलना करून सतत जास्त मिळवण्याच्या नादात माणूस समाधान गमावून बसतो. पैसा कमावण्यासोबतच तो हुशारीने वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
66
गुपितं उघड करणं
प्रत्येक गोष्ट सर्वांसोबत शेअर करणं शहाणपणाचं लक्षण नाही. आपल्या वैयक्तिक अडचणी, आर्थिक स्थिती आणि भविष्यातील प्लॅन्स कोणाला सांगावेत, हे समजणं एक कौशल्य आहे. स्वतःचे कच्चे दुवे आणि प्लॅन्स इतरांना विनाकारण सांगितल्यास भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.