Chia Seeds Benefits : चिया सीड्स खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का?

Published : Sep 11, 2026, 05:01 PM IST

चिया सीड्स दिसायला लहान असल्या तरी त्या ओमेगा-३ फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या महत्त्वाच्या खनिजांनी भरपूर असतात.

PREV
17
चिया सीड्सचे फायदे

मुंबई : चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. यात अल्फा-लिनोलेनिक ऍसिड नावाचं ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतं, जे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतं.

27
सूपरफूड आहे चिया सीड्स
यातील डाएटरी फायबरमुळे पोट साफ राहतं आणि आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते. जे लोक वजन कमी करू इच्छितात, त्यांच्यासाठी चिया सीड्स एक सुपरफूड आहे. भिजवलेल्या चिया सीड्सचं पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होते आणि अतिरिक्त भूक नियंत्रणात राहते.
37
हाडांसाठी फायदेशीर
चिया सीड्सचं पाणी कार्बोहायड्रेट्सचं पचन आणि शोषण मंद करतं. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढत नाही. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने भरपूर असल्यामुळे हे हाडांची घनता वाढवण्यासाठीही मदत करतात. म्हणून भिजवून खाणं हाडांसाठी फायदेशीर ठरतं.
47
पोट भरलेलं राहतं
यातील जेलसारखे फायबर पचनक्रिया मंदावते आणि रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून रोखते. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि लवकर भूक लागत नाही.
57
चिया सिड्स किती वेळ भिजवायच्या?

चिया सीड्स खूप पौष्टिक असतात. अनेक जण ज्यूस, पुडिंग आणि स्मूदीमध्ये याचा वापर करतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की, चिया सीड्स खाण्याआधी नक्की किती वेळ भिजवून ठेवायला हव्यात?

67
चिया सीड्स कायम भिजवूनच खावेत

चिया सीड्स मऊ होण्यासाठी त्यांना २५ ते ३० मिनिटं पाण्यात किंवा दुधात भिजवणं पुरेसं आहे. १ चमचा चिया सीड्स पाण्यात मिसळून ठेवल्यास, त्या पाणी शोषून घेतात आणि जेलसारखा पदार्थ तयार होतो.

77
रात्रभर भिजवून खाणंही फायदेशीर

तसं तर २५ ते ३० मिनिटं भिजवणं पुरेसं आहे. पण ३० मिनिटं ते २ तासांपर्यंत भिजवल्यास त्या अधिक पाणी शोषून घेतात आणि त्यांची रचना अधिक मऊ आणि पूर्ण होते. यामुळे फायदेही जास्त मिळतात. मात्र रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाणंही फायद्याचं ठरतं.

Read more Photos on

Recommended Stories