Venomous Monkey : दिसायला निरागस पण जिवावर बेतत, हे आहे जगातलं विषारी माकड!

Published : Oct 28, 2026, 01:15 PM IST

दिसायला एखाद्या खेळण्यासारखं गोड वाटणारं 'बांका स्लो लोरिस' (Bangka Slow Loris) हे जगातलं सर्वात धोकादायक आणि विषारी माकड आहे. इंडोनेशियाच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या या दुर्मिळ प्राण्याने चावा घेतल्यास माणसाचा जीवही जाऊ शकतो.

PREV
15
दिसायला गोड... पण अत्यंत धोकादायक माकड

जंगलात फिरताना अनेक सुंदर प्राणी आपलं लक्ष वेधून घेतात. विशेषतः दिसायला निरागस आणि गोड असणाऱ्या प्राण्यांना जवळ घ्यावंसं वाटतं. पण दिसायला सुंदर असणारा प्रत्येक प्राणी आपला मित्र असेलच असं नाही.

'बांका स्लो लोरिस' हा असाच एक सुंदर पण अत्यंत धोकादायक प्राणी आहे. माकडांच्या प्रजातीतील या प्राण्याची वैशिष्ट्ये आणि त्याच्यातील विषारी घटकांबद्दल ऐकून कुणालाही धक्का बसेल.

25
ही विषारी माकडे कुठे आढळतात?

हे वेगळे प्राणी प्रामुख्याने इंडोनेशियातील 'बांका बेट', तसेच सुमात्रा आणि बोर्निओच्या जंगलांमध्ये राहतात. घनदाट उष्णकटिबंधीय जंगले आणि झाडांच्या फांद्या हे त्यांचं घर आहे. दिवसा झाडांवर आराम करणारी ही माकडे रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अंधार पडला की, आपल्या मोठ्या गोल डोळ्यांनी ती जंगलात शिकार शोधतात.

35
माणसाचा जीव घेण्याइतपत धोकादायक?

इतर सामान्य स्लो लोरिस प्रजातींपेक्षा 'बांका स्लो लोरिस' हे जगातल्या मोजक्या विषारी प्राण्यांपैकी एक मानलं जातं. माणसांसाठी हे खूप धोकादायक आहे. याच्या कोपराच्या मागच्या बाजूला खास ग्रंथी असतात. या ग्रंथींमधून निघणारा स्त्राव हे माकड चाटतं आणि स्वतःच्या लाळेत मिसळतं. या मिश्रणातून एक अत्यंत घातक विष तयार होतं.

या माकडाने चावा घेतल्यास माणसाच्या शरीरात 'अॅनाफिलेक्टिक शॉक'सारखी भयंकर रिअॅक्शन होते. यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, शरीराला सूज येते, स्नायू दुखतात आणि श्वास घ्यायला त्रास होतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका असतो.

45
तब्बल १०० वर्षांनंतर पुन्हा दिसलं

या प्राण्याचं रूप खूपच वेगळं असतं. चेहऱ्यावरील खास खुणांमुळे ते इतर लोरिस प्रजातींपेक्षा लगेच ओळखता येतं. डोळ्यांभोवतीचे गडद आणि फिकट रंगाचे गोल, तसेच डोक्यावरील रुंद पट्टे याला एक वेगळंच रूप देतात. हे माकड फक्त १० इंच लांब असतं आणि एखाद्या बाहुलीसारखं दिसतं.

रात्रीच्या अंधारात स्पष्ट पाहण्यासाठी याला मोठे गोल डोळे असतात. या प्रजातीचा इतिहास खूप रंजक आहे. १९३७ पासून तब्बल १०० वर्षे हे माकड शास्त्रज्ञांना दिसलंच नव्हतं. त्यामुळे ही प्रजाती नष्ट झाली असावी, असा सर्वांचा समज होता. पण अलीकडेच संशोधकांना हे माकड पुन्हा जिवंत अवस्थेत सापडलं आहे.

55
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती

इतका अद्भुत प्राणी आज अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी आणि जंगलतोडीमुळे यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. याच कारणामुळे 'इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर' (IUCN) ने या प्रजातीला 'अतिधोक्यात असलेली प्रजाती' म्हणून घोषित केलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा दुर्मिळ वन्यजीवांचं संरक्षण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असं संशोधक सांगतात.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories