Money Plant Vastu : घरात मनी प्लांट आहे? चुकूनही करू नका या ५ चुका, नाहीतर व्हाल कंगाल!

Published : Apr 11, 2026, 01:34 PM IST

Money Plant Vastu वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घरात असणं खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरात मनी प्लांट चांगला वाढतो, तिथे पैशांची आवक कायम राहते. पण मनी प्लांटबद्दलच्या काही चुका तुम्हाला कंगालसुद्धा बनवू शकतात.

PREV
16
मनी प्लांटशी संबंधित या ५ गोष्टी लक्षात ठेवा

घरात मनी प्लांट असणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे अनेक घरांमध्ये तुम्हाला हे रोप सहज दिसेल. वास्तुशास्त्रातही मनी प्लांटला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, ज्या घरात मनी प्लांट चांगला वाढतो, तिथे पैशांची कधीच कमतरता भासत नाही. पण मनी प्लांटशी संबंधित काही चुका श्रीमंत व्यक्तीलाही कंगाल बनवू शकतात. त्यामुळे तुमच्या घरात मनी प्लांट असेल, तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं. चला, जाणून घेऊया मनी प्लांटबद्दलच्या काही खास गोष्टी…

26
मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावा?

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला लावावा. ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते असं मानलं जातं. असं केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते. मनी प्लांट चुकूनही उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेला ठेवू नये. या दिशेला ठेवल्यास त्याचे नकारात्मक परिणाम दिसू लागतात.

36
मनी प्लांट बाटलीत लावावा की कुंडीत?

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही मनी प्लांट बाटली आणि कुंडी या दोन्हीमध्ये लावू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बाटली काचेची असावी आणि कुंडी मातीची. प्लास्टिकच्या बाटलीत किंवा सिमेंटच्या कुंडीत मनी प्लांट लावू नका. तसेच, कोणत्याही अस्वच्छ भांड्यात किंवा कंटेनरमध्ये हे रोप लावू नये.

46
मनी प्लांट सुकल्यावर काय करावं?

अनेकदा मनी प्लांटची पानं पिवळी पडू लागतात किंवा सुकू लागतात. याकडे दुर्लक्ष करू नका. हे घरात नकारात्मकता वाढल्याचं लक्षण असू शकतं. अशावेळी पिवळी पडलेली पानं लगेच काढून टाकावीत. जर मनी प्लांटला वारंवार पिवळी पानं येत असतील किंवा तो सुकत असेल, तर संपूर्ण रोप काढून दुसरं नवं रोप लावावं.

56
मनी प्लांट जमिनीवर पसरू देऊ नका

मनी प्लांटची वेल वरच्या दिशेने वाढणं शुभ मानलं जातं. याला आयुष्यातील प्रगतीशी जोडून पाहिलं जातं. त्यामुळे मनी प्लांटची वेल वर जाण्याऐवजी खाली जमिनीच्या दिशेने पसरू लागली, तर ती वरच्या दिशेनेच वाढेल अशी व्यवस्था करा. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

66
या गोष्टीचीही विशेष काळजी घ्या

वास्तुशास्त्रानुसार, विनाकारण मनी प्लांटची छाटणी (कटिंग) करू नये. मनी प्लांटचा जो भाग सुकला असेल किंवा पिवळा पडला असेल, फक्त तोच भाग कापून काढावा. केवळ रोपट्याची सुंदरता वाढवण्यासाठी त्याची छाटणी करू नये. असं केल्यास घरातील सुख-समृद्धी कमी होऊ शकते, असं मानलं जातं.


Disclaimer
या लेखातील माहिती धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषी यांच्याकडून घेतलेली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं केवळ एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीचा वापर केवळ सूचनेसाठी करावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories