दुधात हळद घालून पिण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया.
दुधात हळद घालून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त असलेली हळद यासाठी उपयुक्त ठरते.
अपचन, गॅसमुळे पोट फुगणे, ॲसिडिटी यांसारख्या समस्या टाळण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी दुधात हळद घालून पिणे फायदेशीर आहे.
हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्यामुळे दुधात हळद घालून पिणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
दूध कॅल्शियमने परिपूर्ण असते. त्यामुळे दुधात हळद घालून प्यायल्याने हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठीही ते चांगले ठरते.
रात्री दुधात हळद घालून प्यायल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. हळदीमधील कर्क्युमिन यासाठी मदत करते.
आरोग्य तज्ज्ञ किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घेतल्यानंतरच आहारात बदल करा.
Rameshwar Gavhane