मेकअप काढण्यासाठी बदामाचे तेल ठरेल फायदेशीर, असा करा वापर

Published : Jan 19, 2025, 05:14 PM ISTUpdated : Jan 19, 2025, 05:18 PM IST
Badam Oil for makeup remove

सार

बदामाचे तेल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. याच्या वापराने त्वचेला चमक येण्यासह स्किन टोन सुधारला जातो. जाणून घेऊया मेकअप हटवण्यासाठी बदामाच्या तेलाचा कशाप्रकारे वापर करावा याबद्दल सविस्तर…

Almond Oil for Makeup Remove : बदामाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. बदामामध्ये काही पोषण तत्त्वे असल्याने याचे काही फायदे होतात. बदामाच्या तेलाच्या मदतीने मेकअप हटवला जाऊ शकतो. हा एक नैसर्गिक उपाय आहे. मेकअप हटवण्यासह बदामाच्या तेलाचे त्वचेला काही फायदे देखील होतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई आणि फॅटी अ‍ॅसिड असल्याने त्वचा मऊसर होते.

मेकअप हटवण्यासाठी महागडे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण त्वचेला नैसर्गिक उपायांनी हेल्दी ठेवायचे असल्यास बदामाचे तेल फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया मेकअप हटवण्यासाठी बदामाच्या तेलाचा कशाप्रकारे वापर करावा याबद्दल सविस्तर...

बदामाच्या तेलाचा असा करा वापर

सर्वप्रथम बदामाचे तेल मेकअप रिमूव्हरसारखा वापर करण्यासाठी सर्व सामग्री एकत्रित करा. यावेळी तेल, कॉटन बॉल्स आणि केमिकल फ्री फेसवॉशसह कोमट पाण्याचा वापर करा. यासाठी कॉटन बॉल्सवर बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका आणि चेहऱ्यावरील मेकअप काढण्याचा प्रयत्न करा. यानंतर चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज केल्यानंतर केमिकल फ्री फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा.

गुलाब पाणी आणि बदामाचे तेल

चेहऱ्यावरील मेकअप हटवण्यासाठी गुलाब पाणी आणि बदामाच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी दोन चमचे बदामाच्या तेलात दोन चमचे गुलाब पाणी मिक्स करा. यानंतर कापसाच्या मदतीने डोळे आणि चेहऱ्यावर मेकअप काढण्यास सुरुवात करा. बदामाच्या तेलाचा तेकलटपणा त्वचेवर राहू नये म्हणून केमिकल फ्री फेसवॉशचा वापर करा.

त्वचेसाठी बदामाच्या तेलाचे फायदे

  • बदामाचे तेल त्वचेला सखोल मॉइश्चराइज करते.
  • बदामाच्या तेलातील अँटी-एजिंग गुणधर्मामुळे फ्री रेडिकल्सच्या दुष्परिणांपासून चेहऱ्याच्या त्वचेचे संरक्षण होते.
  • नियमित बदामाच्या तेलाचे वापर केल्याने स्किन टोन सुधारला जातो.
  • त्वचेवरील पोर्स बंद असल्यास बदामाचे तेल वापरू शकता.
  • डार्क सर्कलच्या समस्येवर बदामाचे तेल फायदेशीर आहे.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

घरच्या घरी हर्बल शाम्पू कसा तयार करावा?, जाणून घ्या सोपी पद्धत!

हॉट कॉम्बचे केसांना नुकसान: A ते Z कारणे आणि उपाय

PREV

Recommended Stories

Horoscope 9 December : आज मंगळवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!
फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!