Kurti Designs: साध्या कुर्त्याला द्या ग्लॅमरस टच! रक्षाबंधनसाठी ट्राय करा हे 7 स्टायलिश बॅक डिझाइन्स

Published : Jul 23, 2026, 12:51 PM IST
Kurti Designs: साध्या कुर्त्याला द्या ग्लॅमरस टच! रक्षाबंधनसाठी ट्राय करा हे 7 स्टायलिश बॅक डिझाइन्स

सार

रक्षाबंधन 2026 साठी काहीतरी वेगळं आणि हटके ट्राय करायचंय? मग हे 7 बॅकलेस कुर्ती डिझाइन्स नक्की बघा.

रक्षाबंधन जवळ आलंय आणि तुम्ही कपड्यांची खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण नेहमीचे अनारकली किंवा पटियाला घालून कंटाळा आला असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला 7 अशा बॅकलेस कुर्ती डिझाइन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा साधा लुकही एकदम खास दिसेल. विशेष म्हणजे, या डिझाइन्स तुम्ही फक्त राखीलाच नाही, तर ऑफिस, पार्टी किंवा इतर कार्यक्रमांसाठीही वापरू शकता. चला तर मग पाहूया, तुम्ही टेलरकडून कोणत्या स्टायलिश बॅक डिझाइन्स शिवून घेऊ शकता.

क्रॉस दोरी डिझाइन कुर्ती

लांब किंवा घेरदार कुर्त्यावर क्रॉस दोरी डिझाइन नेहमीच छान दिसते. यामध्ये पातळ दोऱ्या 'X' आकारात क्रॉस पॅटर्नमध्ये बांधून गाठ मारली जाते. हे डिझाइन स्लीव्हलेस पॅटर्नवर तर आणखीच ट्रेंडी दिसतं. तुम्ही जॉर्जेट, कॉटन किंवा नेटच्या कापडावर हे डिझाइन शिवून घेऊ शकता.

की-होल कटआऊट बॅक डिझाइन

जर तुम्हाला पूर्णपणे बॅकलेस लुक नको असेल, तर की-होल कटआऊट डिझाइन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामध्ये कुर्त्याच्या पाठीमागे मध्यभागी अंडाकृती आकारात कट देऊन एक हुक लावला जातो. हे डिझाइन साध्या कॉटन किंवा ए-लाइन कुर्त्यांवर खूपच सुंदर आणि सोबर लुक देतं.

बो-बॅक डिझाइन

हे एक खूपच युनिक आणि क्लासिक बॅक डिझाइन आहे. यामध्ये कुर्ती समोरून साधी असते, पण पाठीमागे कटआऊट स्टाईलमध्ये एक 'बो' (Bow) म्हणजेच फुलपाखराच्या आकाराची गाठ असते. हे डिझाइन तुमच्या साध्या कुर्त्यालाही आकर्षक बनवेल. तुम्ही फ्लोरल प्रिंट, सिल्क किंवा कोणत्याही बेसिक फॅब्रिकवर हे डिझाइन शिवू शकता. यामुळे तुम्हाला स्पोर्टी आणि कॅज्युअल लुक मिळतो.

हे पण वाचा- श्रावणात हिरव्या बांगड्यांसोबत करा खास नेल आर्ट, या 5 डिझाइन्स आहेत सर्वात सुंदर

ब्रॉड डीप व्ही-नेक

व्ही-नेक फक्त पुढच्या गळ्यासाठीच नाही, तर पाठीमागेही खूप छान दिसतो. यामुळे तुमचा संपूर्ण लुक बॅलन्स होतो आणि लक्ष पाठीकडे वेधले जाते. यासोबत तुम्ही साधी दोरी आणि लटकन लावू शकता किंवा आणखी बोल्ड आणि पारंपरिक लुकसाठी हेवी टसल्सचा वापर करू शकता.

हे पण वाचा- मनी प्लांटच्या वेलीपासून असं तयार करा नवीन रोप, कटिंग न करताही फुटतील मुळं

डबल दोरी बॅक डिझाइन

हे कुर्ती डिझाइन सर्वात ग्लॅमरस आहे. यामध्ये साध्या दोरीऐवजी डबल लेअरमध्ये दोऱ्या लावल्या जातात. सोबतच, साध्या दोरीऐवजी घुंगरूवाल्या दोरीमुळे लुक आणखी आकर्षक दिसतो. हे डिझाइन तुम्हाला बोल्ड आणि एथनिक ग्लॅमर लुक देईल.

मल्टी-स्ट्रॅप बॅक डिझाइन

शॉर्ट किंवा फुल लेंथ कुर्त्यावर मल्टी-स्ट्रॅप बॅक डिझाइन उत्तम पर्याय आहे. फ्लेअर्ड किंवा कॉटन कुर्त्यावर हे डिझाइन खूप कूल आणि एफर्टलेस लुक देतं. जर तुम्हाला थोडे रिव्हिलिंग कपडे घालायला आवडत असतील, तर तुम्ही हा पर्याय नक्की निवडू शकता.

बोहो कटआऊट दोरी बॅक डिझाइन

हे एक खूपच युनिक आणि सुंदर बॅक डिझाइन आहे. यामध्ये मोठ्या आरशांच्या पॅचेसला हायलाइट करत एक दोरी लावलेली असते, ज्यामुळे पाठीमागून खूपच एथनिक आणि ग्लॅमरस लुक येतो. तुम्ही हे डिझाइन मिरर वर्क जीन्स, स्कर्ट किंवा फ्लेअर्ड प्लाझोसोबत घालून ट्रेंडी एथनिक लुक मिळवू शकता.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bay Leaf: उशीखाली फक्त एक तमालपत्र ठेवा आणि चमत्कार पाहा!
Mattress Under 10000: १० हजार की २० हजार? कोणता मॅट्रेस घेणं ठरेल फायद्याचं?