वजन कमी करताना जेवणाच्याआधी फक्त 'या' 7 गोष्टी लक्षात ठेवा

Published : Feb 14, 2025, 04:01 PM ISTUpdated : Feb 14, 2025, 04:02 PM IST
Popular diet to reduce belly fat

सार

सध्या बहुतांशजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. अशातच वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट ते व्यायामाचे प्रकार केले जातात. पण तरीही वजन कमी होत नाही. अशातच वजन कमी करत असताना जेवणाआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.

Tips for weight loss : वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करत असतो. अनेकजण हेल्दी आहार घेऊन दिवसाची सुरूवात करतात. जसजसे दिवस निघत जातात तसतसं कॅलरीजयुक्त, गोड पदार्थ खाण्यास सुरूवात होते. जास्तीत जास्त लोक हे रात्रीच्या जेवणात अनहेल्दी पदार्थांचा समावेश करतात. ओव्हरइटिंगमुळे वजन कमी करणं कठीण होतं. ह्या लेखात तुम्हाला जेवणाच्यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घेतल्यास वजन कमी होऊ शकतं याबाबत सांगणार आहे.

  • वजन कमी करण्यासाठी तुम्ही कॅलरीजची एक मर्यादा ठेवायला हवी. रात्रीच्यावेळी दोन घास कमी खा. ओव्हरइटींग करू नका. जास्तीत जास्त पौष्टीक आणि हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
  • जेवण बनवताना तुम्ही ज्या तेलाचा वापर करता. त्या तेलात किती प्रमाणात कॅलरीज आहेत. हे आधी पाहून घ्या. जर तुम्ही जास्त तळलेले पदार्थ दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी खात असाल तर तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. ऑलिव ऑईल, नारळाचं तेल किंवा कोणतंही तेल असो. जेवणात तेलाचे प्रमाण कमीत कमी असायला हवं.
  • रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणा दरम्यान आपण काय आणि किती खाल्ले याचा आपल्या वजनावर परिणाम होतो. जर आपण दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणात खूप गॅप घेत असाल तर जास्त भूक लागल्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही जास्त खाणे सुरू कराल. म्हणून संध्याकाळी स्नॅक्स वेळेवर घ्या.
  • अनेकदा पिण्याच्या पाण्याचे महत्व लोकांना कळत नाही. पाणी फक्त आपल्याला हायड्रेटेड ठेवत नाहीत तर आपल्याला आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि कमी खाण्यास मदत करतात. जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी एक मोठा ग्लास भरून पाणी प्या.
  • अन्न नेहमी शांत मनाने खावे. जेवताना कधीही टीव्ही पाहू नये. त्यामुळे आपले पोट कधी भरलेले आहे हे देखील आपल्याला कळत नाही आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं जातं. काळजीपूर्वक खाल्ल्याने तुम्ही तुमच्या कॅलरीचे सेवन आरामात करू शकता.
  • झोपायच्या वेळेच्या २ तास आधी रात्रीचे जेवण संपवा. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर 7 वाजेपर्यंत नियमित जेवण करा आणि झोपायला जा. उशिरा जेवल्यानंतर लगेच झोपायला गेल्याने लोकांचे वजन कमी होत नाही.
  • एका संशोधनानुसार असे आढळले आहे की इतर कार्बपेक्षा बटाटे जास्त खाल्ल्याने पोट पूर्ण भरले जाते. बटाटे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो हा गैरसमज आहे. याउलट, त्यात भरपूर फायबर आणि चांगल्या प्रतीचे कार्ब असतात. आपल्याला फक्त कमी प्रमाणात खाण्याची आवश्यकता आहे.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

दररोज उलट चालण्याचे भन्नाट फायदे, मानसिक आरोग्यही सुधारेल

तेलकट-तळलेल्या पदार्थांसाठी वापरा हे 4 तेल, आरोग्यही राखले जाईल

PREV

Recommended Stories

हिऱ्यांचा लूक फक्त ₹2K मध्ये! स्टोन वर्कसह चांदीच्या मंगळसूत्र डिझाईन्स; पाहा बजेटमधील 'डायमंड' कलेक्शन!
घराची शोभा वाढवतील ही ५ रंगीबेरंगी पानांची इनडोअर रोपे, हिवाळ्यात घरात करा लागवड