पालक म्हणून तुम्ही मुलांना संपत्ती द्या किंवा नका देऊ, पण चांगले संस्कार नक्की द्या. मोठे झाल्यावर या गोष्टी सांगून उपयोग नाही. विशेषतः ८ वर्षांचे होण्याआधीच मुलांना काही गोष्टी शिकवणं गरजेचं आहे. चला, जाणून घेऊया त्या कोणत्या आहेत.
१. मुलं सुद्धा रडू शकतात: आपल्या समाजात 'मुलं रडत नाहीत' असं सारखं सांगितलं जातं. कुणी रडलं तर 'मुलीसारखा काय रडतोस?' असं म्हणतात. पण यात काहीच तथ्य नाही, हे आईने मुलाला समजावून सांगितलं पाहिजे. राग, प्रेम, दुःख, आनंद जसा आपण व्यक्त करतो, तसंच रडणंही आहे, हे मुलांना सांगा. भावना दाबून ठेवण्याची गरज नाही. रडणं म्हणजे कमकुवतपणा नाही, हे त्याला पटवून द्या. दुःख मनात दाबून ठेवणं आरोग्यासाठी चांगलं नाही. २. मुलींचा आदर करायला हवा: घरात फक्त आईचाच नाही, तर पत्नी, बहीण, मैत्रीण अशा प्रत्येक स्त्रीचा आदर करायला हवा. ही गोष्ट लहानपणापासूनच शिकवली पाहिजे. खरा मोठेपणा इतरांचा आदर करण्यातच असतो. ही सवय एकदम मोठेपणी लागत नाही, त्यामुळे आईने लहानपणापासूनच मुलाला हे शिकवावं.
22
3. चूक मान्य करणे आणि माफी मागणे..
३. चूक मान्य करणे आणि माफी मागणे: प्रत्येक माणूस कधी ना कधी चुका करतो, हे खूप सामान्य आहे. पण केलेली चूक मान्य करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच, मुलांनी चूक केल्यास ती स्वीकारायला शिकवा. केलेल्या चुकीबद्दल इतरांची माफी मागणे हा सुद्धा एक चांगला गुण आहे. ही गोष्ट मुलांना नक्की शिकवा. ४. घरकाम सर्वांची जबाबदारी: अनेकदा 'घरकाम ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे' ही भावना मुलांच्या मनात लहानपणापासूनच रुजलेली असते. हा विचार बदलायला हवा. घरकाम ही घरातील सर्वांची जबाबदारी आहे, हे लहानपणापासून शिकवा. 'हे बायकांचं काम आहे' अशी भावना मुलांच्या मनात येऊ देऊ नका. स्वयंपाक करणं, घर स्वच्छ करणं, भांडी घासणं... काम कोणतंही असो, मुलांना ते करायला शिकवा. ५. फक्त पैसे कमावणे महत्त्वाचे नाही: आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे फक्त पैसे कमावणं किंवा जास्त पगार असणं नाही. प्रामाणिक राहणं, इतरांशी दयाळूपणे वागणं आणि गरजूंना मदत करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. खरं यश यातच मिळतं. ६. रागात बोलताना तोल सांभाळा: माणसाला राग येणं स्वाभाविक आहे. पण रागात बोललेले शब्द आयुष्यभर मनाला लागतात. म्हणून, कितीही राग आला तरी बोलताना तोल जाऊ देऊ नका. कोणताही शब्द बोलण्यापूर्वी शंभर वेळा विचार करणं महत्त्वाचं आहे. ७. शिकणं कधीच थांबवू नका: आयुष्यात प्रत्येक दिवस एक नवीन धडा शिकवतो. फक्त पुस्तकांमधूनच नाही, तर माणसांकडून, अनुभवांमधून आणि चुकांमधूनही शिकायला हवं. हेच तुम्हाला आयुष्यात जिंकायला मदत करेल. या गोष्टी मुलांना फक्त आईच सांगू शकते. पालकांनी हे नक्की करा: आपण सांगितलेलं सगळं मुलं ऐकतात आणि तसंच वागतात, हा आपला भ्रम असतो. आपण सांगितलेल्या गोष्टी मुलांनी शिकाव्यात असं वाटत असेल, तर आधी आपण स्वतः त्यांचं पालन केलं पाहिजे. मुलं आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून जास्त शिकतात. त्यामुळे आदर, प्रामाणिकपणा, प्रेम आणि जबाबदारी यांसारखी मूल्यं शब्दांसोबतच आपल्या वागण्यातूनही मुलांना शिकवा.