हाडं मजबूत ठेवण्यासाठी शरीरात पुरेसं कॅल्शियम असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, तरी तुमच्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश नक्की करा.
हाडं मजबूत करायचीयेत? मग कॅल्शियम भरपूर असलेले हे ७ पदार्थ रोज खा
हाडं मजबूत ठेवण्यासाठी शरीरात पुरेसं कॅल्शियम असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही वयाचे असाल, तरी तुमच्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश नक्की करा. शरीराला आवश्यक असलेल्या सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी कॅल्शियम एक आहे. शरीर स्वतः कॅल्शियम तयार करत नाही, त्यामुळे कॅल्शियम असलेले पदार्थ खाणं आवश्यक आहे. हाडं मजबूत करण्यासाठी आहारात कोणते कॅल्शियम युक्त पदार्थ घ्यावेत ते पाहूया.
27
दूध, चीझ आणि दह्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.
दूध, चीझ आणि दह्यासारखे दुधाचे पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कारण यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने आणि अनेकदा व्हिटॅमिन डी सारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात.
37
१०० ग्रॅम पालकमध्ये ९९ मिलीग्राम कॅल्शियम असतं.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. १०० ग्रॅम पालकमध्ये ९९ मिलीग्राम कॅल्शियम असतं. याशिवाय या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के सारखी इतर आवश्यक पोषक तत्वेही असतात, जी हाडांच्या आरोग्यासाठी चांगली असतात.
सॅल्मन आणि सार्डिन सारख्या माशांमध्ये भरपूर कॅल्शियम असतं.
सॅल्मन आणि सार्डिन सारख्या माशांमध्ये भरपूर कॅल्शियम असतं. सॅल्मनमध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा असतं, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करतं. याव्यतिरिक्त, यातील ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् हाडांना आवश्यक चरबी पुरवतात आणि त्यांना मजबूत आणि लवचिक बनवण्यास मदत करतात.
57
बदाम आणि चिया बिया कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत.
बदामामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. हे दोन्ही हाडं, स्नायू आणि सांध्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात. बदाम तुम्ही बदामाचं दूध, बदाम बटर यासारख्या अनेक स्वरूपात खाऊ शकता.
67
अंड्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखी अनेक पोषक तत्वे असतात.
अंड्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखी अनेक पोषक तत्वे असतात. हे सर्व हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पण आवश्यक पोषक तत्वे पूर्णपणे मिळवण्यासाठी फक्त अंड्याचा पांढरा भाग खाऊ नका, तर पूर्ण अंडं खा.
77
ऍसिडस् हाडांच्या आरोग्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
चिया बियांमधील प्रथिने आणि आवश्यक फॅटी ऍसिडस् हाडांच्या आरोग्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चिया बियांमध्ये आढळणारे 'बोरॉन' नावाचे खनिज हाडांच्या वाढीस मदत करते. हे शरीरातील फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे चयापचय नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.