
Saree Jewelry Styling Tips: काळ्या आणि लाल रंगाची साडी... हे कॉम्बिनेशनच इतकं बोल्ड आणि सुंदर आहे की विचारायलाच नको! पण यावर कोणती ज्वेलरी घालायची, हे ठरलं की तुमचा लुक काही मिनिटांतच रॉयल आणि आकर्षक दिसू लागतो. लग्न असो, पार्टी असो किंवा कोणताही सण, हे क्लासिक कलर कॉम्बिनेशन नेहमीच भाव खाऊन जातं. चला, पाहूया अशा 6 ज्वेलरी स्टाइल्स, ज्या तुमच्या लुकला चार चाँद लावतील.
काळ्या-लाल साडीवर गोल्ड चोकर सेट एकदम रॉयल आणि पारंपरिक लुक देतो. विशेषतः डीप नेक ब्लाउजसोबत तो खूपच उठून दिसतो. तुम्हाला जर हेवी ज्वेलरी आवडत असेल, तर चोकरसोबत छोटे कानातले घाला. लग्नसमारंभ किंवा रिसेप्शनसाठी हा स्टाइल परफेक्ट आहे.
कुंदन ज्वेलरीचा क्लासच वेगळा! काळ्या-लाल साडीसोबत तर ती अप्रतिम दिसते. तिची हलकी चमक आणि रिच फिनिशिंग तुमच्या लुकला खूप क्लासी बनवते. तुम्ही कुंदन नेकलेससोबत मॅचिंग झुमके घालू शकता. सणासुदीच्या दिवशी किंवा पारंपरिक कार्यक्रमांमध्ये हा स्टाइल खूपच सुंदर दिसतो.
तुम्हाला काहीतरी वेगळं आणि ट्रेंडी ट्राय करायचं असेल, तर ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी नक्की वापरून पाहा. ही ज्वेलरी काळ्या साडीवर खूपच स्टायलिश दिसते आणि लाल रंगालाही बॅलन्स करते. मोठे झुमके किंवा एखादा स्टेटमेंट नेकलेस घातल्यास इंडो-वेस्टर्न लुक मिळतो, जो सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.
मोत्यांच्या दागिन्यांचा सॉफ्ट आणि क्लासी लुक काळ्या-लाल साडीवर खूपच छान दिसतो. विशेषतः तुम्हाला जर कमीत कमी दागिने घालायला आवडत असतील, तर मोत्यांचा नेकलेस किंवा कानातले टॉप्स एक उत्तम पर्याय आहे. ऑफिस पार्टी किंवा दिवसाच्या कार्यक्रमांसाठी हा लुक खूपच सुंदर आणि आकर्षक वाटतो.
टेम्पल ज्वेलरीचा रिच आणि पारंपरिक लुक काळ्या-लाल साडीवर खूपच भारी दिसतो. ज्यांना साऊथ इंडियन स्टाइल आवडते, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. गोल्डन फिनिशिंग आणि देवी-देवतांच्या डिझाइनमुळे ही ज्वेलरी खास ठरते आणि तुमच्या लुकला एक वेगळाच रॉयल टच देते.
तुम्हाला गळ्यात काही घालायचं नसेल, तर मोठे आणि स्टायलिश स्टेटमेंट इअररिंग्स निवडा. काळ्या-लाल साडीवर चांदबाली किंवा मोठे झुमके खूपच छान दिसतात. केसामध्ये अंबाडा घातल्यास हे दागिने आणखी उठून दिसतात. कमी दागिन्यांमध्ये ग्लॅमरस लुक मिळवण्यासाठी हा स्टाइल एकदम परफेक्ट आहे.