
गव्हाचे पीठ मार्केटमधून खरेदी करण्यासाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागतात. याशिवाय पीठाची चवही फार वेगळी लागते. यामुळे बहुतांशजण गहू खरेदी करुन पीठाच्या गिरणीमध्ये दळण्यासाठी देतात. पण पीठात मर्यादित कालानंतर किडे किंवा टोके पडल्याची समस्या उद्भवली जाते. यावर पुढील काही ट्रिक्स फॉलो करू शकता.
दळलेल्या गव्हाच्या पीठाला किड लागण्याचे मुख्य कारण म्हणजे किडे. पीठाला हवा लागल्यास खराब होऊ लागते. यामुळेच पीठामध्ये किडे पडतात. अशातच गव्हाच्या पीठाला झाकणबंद डब्यामध्ये ठेवा.
गव्हाचे पीठ डब्यामध्ये ठेवल्यानंतर वेळोवेळी उन्हामध्ये सुकवा. असे केल्याने पीठामध्ये ओलसरपणा राहणार नाही.
गव्हाचे पीठ खराब होऊ नये म्हणून काचेच्या जारमध्ये ठेवू शकता. असे केल्याने पीठ 10 महिन्यांपर्यंत फ्रेश राहू शकते.
गव्हाच्या पीठात लवंग किंवा तमालपत्र घालून ठेवल्याने किडे पडत नाहीत. याशिवाय पीठात कडुलिंबाची पाने आणि सैंधव मीठही घालू शकता.
गव्हाचे पीठ लहान पोत्यात ठेवून एका डब्यात ठेवा. यामुळे पीठाला येणारा ओलसरपणा दूर होतो.
गव्हाचे पीठ डब्यामध्ये ठेवण्यापूर्वी तो ओलसर नसावा. जेणेकरुन पीठ लवकर खराब होईल.
आणखी वाचा :
भाजीमधून किडे काढण्यासाठी वापरा या 5 ट्रिक, मिनिटांत होईल स्वच्छ
फणसाचे गर घरच्या घरी कसे काढावेत, सोपी पद्धत जाणून घ्या