वयाआधीच केस पांढरे झालेत? डेली रुटीनमध्ये फॉलो करा या 5 टिप्स

काहींचे वयाआधीच केस पांढरे होण्यास सुरुवात होते. यामागे काही कारणे असू शकतात. खरंतर, सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळेही केस वयाआधीच पांढरे होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी काय करावे जाणून घेऊया. 

Tips for Premature White Hair : वाढत्या वयासह आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू लागतात. जसे की, डबल चीन, वजन वाढणे, हाडं कमकूवत होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे. याशिवाय केस गळण्यासह केस पांढरे होण्यासही सुरुवात होते. पण वयाच्या 25 ते 30 व्या वर्षात केस पांढरे होण्यास सुरुवात झाल्यास टेन्शन येणे सामान्य बाब आहे. कारण यामुळे आत्मविश्वास ढासळण्यासह चारचौघांत उभे राहताना लाज वाटते. अशातच डेली रुटीनमधील काही सवयींमध्ये बदल केल्यास वयाआधीच होणाऱ्या पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

तणावापासून दूर राहा
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात व्यक्तीवर अनेक जबाबदाऱ्यांचा बोझा पडल्याचे दिसून येते. यामुळे नैराश्य आणि तणावाची स्थिती कधीकधी उद्भवली जाते. काही रिसर्चनुसार, तणावामुळेही केस वयाआधी पांढरे होतात हे समोर आले आहे. यामुळे तणावापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करणे महत्वाचे आहे. याशिवाय मन शांत राहण्यासाठी मेडिटेशन, योगा देखील करू शकता.

अनहेल्दी फूडपासून दूर राहा
बहुतांशजण दररोज अधिक तेलकट आणि जंक फूड खाणे पसंत करतात. यामुळे तोंडाची चव वाढली जाते. पण आरोग्य बिघडले जाते. यामुळेही केस पांढरे होण्यास सुरुवात होऊ शकते. यासाठी डाएटमध्ये प्रोटीन, बायोटिन, लोह, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिनचे सेवन करावे.

पुरेशा प्रमाणात झोप घ्या
कमी झोप घेत असल्याचा त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे केसांवरही प्रभाव पडत पांढरे होण्यास सुरुवात होते. यासाठी कमीतकमी 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेणे अत्यंत महत्वाचे असते.

केसांना तेल लावा
केसांच्या आरोग्यासाठी तेल लावणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे केसांना आतमधून पोषण मिळते आणि केस पांढरे होण्याच्या समस्येपासून दूर राहता. यासाठी ऑलिव्ह ऑइल, कॅस्टर ऑइल अथवा तीळाचे तेल, नारळाचे तेल केसांच्या मसाजसाठी लावू शकता.

धुम्रपानापासून दूर राहा
तरुणवर्गामध्ये सध्या स्मोकिंग करण्याचा एक ट्रेन्ड झाला आहे. याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतोच. याशिवाय केस वयाआधीच पांढरी होण्यास सुरुवात होते. यामुळे धुम्रपान करण्याच्या सवयीपासून दूर राहा.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

दररोज सकाळी करा ही 3 योगासने, दिवाळीआधी यकृत आणि किडनी होईल डिटॉक्स

चेहऱ्याला लावा हे 4 प्रकारचे Essential Oils, नितळ आणि चमकदार होईल त्वचा

Share this article