आपण रोज 'हेल्दी' समजून जे पॅकेटबंद पदार्थ खातो, ते खरंच आरोग्यासाठी चांगले असतात का? फ्लेवर्ड योगर्टपासून ते मल्टीग्रेन ब्रेडपर्यंत, असे कोणते पदार्थ आहेत ज्यांपासून आपण सावध राहायला हवं?
आजकाल लोक आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. पण याच गोष्टीचा फायदा घेत बाजारात 'हेल्दी'च्या नावाखाली प्रोसेस्ड फूड्स विकण्याचा ट्रेंड वाढला आहे. आपण हे पदार्थ निरोगी समजून विकत घेतो. पण कंपन्या यात भरपूर साखर, मीठ, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि पाम तेल लपवून ठेवतात. आपण हे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट करतो. पण हे पदार्थ फायदा देण्याऐवजी शरीराचं नुकसानच करतात. चला तर मग, तुमच्या किचनमधील असे कोणते पदार्थ आहेत जे 'हेल्दी' वाटतात पण प्रत्यक्षात अनहेल्दी आहेत, ते पाहूया.
26
फ्लेवर्ड योगर्ट
दही पचनासाठी खूप फायदेशीर असतं हे खरं आहे. पण बाजारात मिळणारे फ्लेवर्ड योगर्ट तितकेसे चांगले नसतात. कंपन्या यात चव वाढवण्यासाठी भरपूर साखर आणि कृत्रिम फ्लेवर्स मिसळतात. तुम्ही हे रोज खाल्ले तर तुमचं वजन वाढू शकतं आणि ब्लड शुगरही वेगाने वाढू शकते. शिवाय, यातून तुमच्या पोटाला किंवा आतड्यांना कोणताही विशेष फायदा मिळत नाही.
36
व्हेजिटेबल चिप्स
बटाटा चिप्सला हेल्दी पर्याय म्हणून लोक व्हेजिटेबल चिप्स विकत घेतात. बाजारात नाचणीच्या चिप्ससारखे पर्यायही मिळतात. पण कंपन्या हे चिप्स सुद्धा डीप फ्राय करतात. खूप जास्त तापमानात तळल्यामुळे यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. याव्यतिरिक्त, यात मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं.
लोक एनर्जी बारला एक उत्तम हेल्दी स्नॅक मानतात. हे बार ड्रायफ्रुट्स आणि ओट्सपासून बनवले जातात असा दावा कंपन्या करतात. पण प्रत्यक्षात यात चव आणण्यासाठी कॉर्न सिरप, साखर, व्हेजिटेबल ऑइल आणि अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरले जातात. त्यामुळे तुम्ही जेवढे हेल्दी समजून हे बार खाता, तेवढे ते अजिबात नसतात.
56
पॅकेटबंद ज्यूस
पॅकेटबंद ज्यूस विकणाऱ्या कंपन्या नेहमी '100% नॅचरल' किंवा 'नो ॲडेड शुगर' असा दावा करतात. पण हे ज्यूस ताज्या फळांची जागा कधीच घेऊ शकत नाहीत. पॅकिंगच्या प्रक्रियेत फळांमधील फायबर पूर्णपणे नष्ट होतं. यात फक्त फ्रक्टोज उरतं. यामुळे तुमची ब्लड शुगर वेगाने वाढू शकते. त्यामुळे '100% नॅचरल' लेबल असलेले ज्यूसही आरोग्यासाठी चांगले नसतात.
66
मल्टीग्रेन ब्रेड
व्हाईट ब्रेडला हेल्दी पर्याय म्हणून मल्टीग्रेन ब्रेडची खूप जाहिरात केली जाते. पण मल्टीग्रेन लिहिलंय म्हणजे तो ब्रेड संपूर्ण गव्हापासून बनवलाय असं अजिबात नाही. बहुतांश ब्रेडमध्ये मैदाच असतो. कंपन्या फक्त वरून थोडे सीड्स किंवा इतर धान्य लावतात. याला ब्राऊन रंग देण्यासाठी अनेकदा कृत्रिम रंगही वापरला जातो, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.