व्यायामावेळी केलेल्या या 5 चुका ठरतील एंग्जायटीचे कारण, असे राहा दूर

आजकाल बहुतांशजण फिटनेच्याप्रति अधिक जागृक झाले आहेत. यामुळे हेल्दी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाची मदत घेतात. पण तुम्हाला माहितेय का, चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने तणाव वाढला जाऊ शकतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

Health Care Tips : व्यायामामुळे तन आणि मन शांत राहण्यास मदत होते. पण व्यायामावेळी केलेल्या काही सामान्य चुकांचा देखील आरोग्यावर उलट परिणाम होऊ शकतो. जर योग्य पद्धतीने व्यायाम केला नाही तर मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडला जातो. यामुळे व्यक्तीमध्ये एंग्जायटी, तणाव वाढला जाऊ शकतो. जाणून घेऊया अशा कोणत्या 5 सामान्य चुका ज्या व्यायामावेळी करु नये याबद्दल सविस्तर...

अधिक व्यायाम करणे
अधिक व्यायाम केल्याने शरिरातील तणाव निर्माण करणारा हार्मोन कोर्टिसोलचा स्तर वाढला जाऊ शकतो. ज्यावेळी आपण अधिक मेहनत करतो तेव्हा आपले शरिर त्याला तणावाच्या रुपात घेते. यामुळे एंग्जायटीची समस्या वाढली जाऊ शकते. यामुळेच एकाचवेळी मर्यापेक्षा व्यायाम करू नये. शरिराला आराम देणेही महत्वाचे आहे.

झोपण्याआधी व्यायाम करणे
रात्रीच्या वेळी व्यायाम केल्याने शरिरातील उर्जेचा स्तर वाढला जातो. यामुळे झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. झोप पूर्ण न झाल्यास मन अशांत होते. अशातच एंग्जायटीची समस्या अधिक वाढली जाऊ शकते. यामुळे प्रयत्न करा की, झोपण्याच्या कमीतकमी तीन ते चार तास आधी व्यायाम करावा. जेणेकरुन तन आणि मन शांत राहिल.

अधिक कार्डियो करणे
कार्डियो एक्सरसाइज शरिरासाठी उत्तम व्यायाम प्रकार आहे. पण अत्याधिक प्रमाणात कार्डियो एक्सरसाइज करणे चिंतेचे कारण ठरू शकते. 45 मिनिटांपेक्षा अधिक वेळ कार्डियो केल्यानंतर शरिरात कोर्टिसोलचा स्तर वाढला जातो. यामुळे एंग्जायटी ट्रिगर होऊ शकते.

व्यायामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दबाव
व्यायामाचे लक्ष्य पूर्ण करणे महत्वाचे आहे. पण व्यायाम करताना लक्ष्य पूर्ण करायचे आहे म्हणून अधिक व्यायाम केल्यास तुमच्यामधील एंग्जायटी वाढली जाऊ शकते. यामुळे व्यायाम करताना आपल्या शरिराला झेपेल ऐवढाच करावा.

व्यायामाची चुकीची पद्धत
चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने शरिरात थकवा जाणवू शकतो. यामुळेही चिंता वाढली जाऊ शकते. व्यायाम करताना योग्य पद्धत आणि पोजिशनकडे लक्ष द्यावे. जेणेकरुन मानसिक रुपात संतुलन आणि शांती मिळेल.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

चष्मापासून होईल सुटका, करा हे 5 घरगुती आयुर्वेदिक उपाय

सुखी वैवाहिक आयुष्यासाठी 7 खास सीक्रेट, प्रत्येक कपलला माहित असावेत

Share this article