Chia Seeds For Weight Loss: चिया सीड्सने खूप कमी वेळात लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विशेषतः वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी चिया सीड्स खाणे खूप चांगले आहे.
कोणताही पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी, गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे, चिया सीड्स जास्त प्रमाणात खाणे टाळावे. मर्यादित प्रमाणात रोज खाण्यास काही हरकत नाही.
25
किती प्रमाणात खावे?
प्रौढ व्यक्ती दररोज दोन टेबलस्पूनपर्यंत चिया सीड्स खाऊ शकतात. या प्रमाणात खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि दुष्परिणामांपासून बचाव होतो.
35
कसे खावे?
सुके चिया सीड्स खाणे टाळावे. त्याऐवजी, पाण्यात भिजवून खाणे चांगले असते. तुम्ही ते पाणी, दूध किंवा दह्यामध्ये भिजवून खाऊ शकता.
चिया सीड्समध्ये अनेक गुणधर्म असले तरी, प्रत्येकजण ते खाऊ शकत नाही. ज्यांना फायबरचे प्रमाण नियंत्रित करायचे आहे, त्यांनी चिया सीड्स जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
55
अवयवांच्या आरोग्यावर परिणाम
चिया सीड्स खाल्ल्याने कोणत्याही अवयवांना नुकसान होत नाही. पण, ते योग्य प्रमाणात खाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.