Oily Skin Makeup : तेलकट चेहऱ्यावर मेकअप टिकत नाहीये? लक्षात ठेवा या 5 टिप्स

Published : Sep 03, 2026, 02:21 PM IST
Oily Skin Makeup

सार

तेलकट त्वचेमुळे मेकअप खराब होतोय का? चेहऱ्यावर फाउंडेशन बसत नाहीये? पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी मिळवा ऑईल-फ्री आणि मॅट फिनिश त्वचा. यासाठी ५ सोपे घरगुती उपाय जाणून घ्या.

मुंबई : तेलकट त्वचा असलेल्या अनेकांना मेकअप करताना फाउंडेशन चेहऱ्यावर नीट बसत नाही, काही वेळातच चेहरा अधिक ऑयली दिसू लागतो किंवा मेकअप पॅची होतो. मात्र, यासाठी महागडी स्किन केअर प्रोडक्ट्स किंवा पार्लरची गरज नाही. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही सोप्या गोष्टींच्या मदतीने त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करून चेहऱ्याला फ्रेश आणि मॅट लुक देता येतो. चला तर मग जाणून घेऊया तेलकट त्वचेसाठी ५ सोपे घरगुती उपाय, ज्यामुळे मेकअपही अधिक काळ टिकण्यास मदत होऊ शकते.

या टिप्स करा फॉलो

१. मुलतानी माती आणि गुलाब जल पॅक:

तेलकटपणा शोषून घेण्यासाठी यापेक्षा चांगला उपाय नाही. २ चमचे मुलतानी मातीमध्ये गरजेनुसार गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. मेकअप करण्यापूर्वी हा पॅक लावल्यास मेकअप जास्त काळ टिकतो.

२. बेसन आणि दही :

बेसन एक नैसर्गिक क्लिन्झर आहे. १ चमचा बेसन, १ चमचा दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हा पॅक त्वचेवरील अतिरिक्त तेल, घाण आणि ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत करतो.

३. टोमॅटो टोनर :

टोमॅटोमध्ये नैसर्गिक ॲसिड असतं, जे त्वचेतील तेल नियंत्रित करतं. एक टोमॅटो अर्धा कापून चेहऱ्यावर ५ मिनिटे हलक्या हाताने घासा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे टोनरप्रमाणे काम करतं, ज्यामुळे पोअर्स (pores) लहान होतात आणि तेलकटपणा कमी होतो.

४. बर्फाने मसाज :

मेकअप करण्यापूर्वी, एका स्वच्छ कापडात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि चेहऱ्यावर १ मिनिट फिरवा. यामुळे घाम कमी येतो, पोअर्स बंद होतात आणि मेकअप चेहऱ्यावर छान बसतो. शिवाय, तो तासन्तास टिकतो.

५. चेहरा धुण्याची योग्य पद्धत

दिवसातून ३ पेक्षा जास्त वेळा फेसवॉश वापरू नका. जास्त फेसवॉश वापरल्याने उलट त्वचेतील तेलकटपणा वाढतो. सकाळी आणि रात्री जेल-बेस्ड फेसवॉश वापरा. चेहरा धुतल्यानंतर ऑईल-फ्री मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते, हा एक मोठा गैरसमज आहे.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026: नवरात्रीत घर सजवायचंय? तोरण आणि रांगोळीच्या डिझाईनसाठी हे ५ AI प्रॉम्प्ट्स नक्की ट्राय करा
Food Safety : सणांनंतर उरलेली मिठाई आणि फराळ असाच ठेवताय? जीवावर बेतू शकतं!