Gardening Mistakes: बागकाम करताना 'या' ५ चुका टाळा, नाहीतर झाडं वाढणार नाहीत आणि मरून जातील!

Published : Mar 10, 2026, 06:00 PM IST
soil plant

सार

झाडांना निरोगी ठेवण्यासाठी खुरपणी आणि माती भुसभुशीत करणं गरजेचं आहे. पण काही चुकांमुळे झाडांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं. या ५ गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमची झाडं हिरवीगार राहतील.

बागकाम करताना झाडांना निरोगी ठेवण्यासाठी खुरपणी (Weeding) आणि माती भुसभुशीत (Loosening Soil) करणं खूप महत्त्वाचं असतं. यामुळे मातीत हवा खेळती राहते, मुळांना पसरायला जागा मिळते आणि झाडाची वाढ वेगाने होते. पण अनेकजण खुरपणी करताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे झाड कमजोर होऊ शकतं किंवा पूर्णपणे सुकूनही जाऊ शकतं. जर तुम्हाला तुमची झाडं हिरवीगार आणि टवटवीत हवी असतील, तर खुरपणी करताना या ५ चुका करणं टाळा.

मुळांच्या अगदी जवळ खणणे

अनेकजण झाडाच्या अगदी जवळून माती उकरायला लागतात. यामुळे झाडाची नाजूक मुळं तुटू शकतात. एकदा मुळांना इजा झाली की झाड हळूहळू सुकायला लागतं. त्यामुळे नेहमी झाडाच्या खोडापासून २-३ इंच दूरच माती हलक्या हाताने सैल करा आणि जास्त खोल खणणं टाळा.

खूप खोलपर्यंत माती उकरणे

जर तुम्ही खूप खोलपर्यंत माती उकरली, तर मुळांना नुकसान पोहोचू शकतं आणि मातीतली झाडाची पकड ढिली होते. त्यामुळे फक्त वरची १-२ इंच मातीच भुसभुशीत करा आणि अगदी हलक्या हाताने खुरपणी करा.

कोरड्या मातीत खुरपणी करणे

पूर्णपणे कोरड्या आणि कडक मातीत खुरपणी केल्यास मुळांना धक्का बसू शकतो. खुरपणी करण्याआधी मातीला थोडं पाणी घालून ओलसर करून घ्या. हलकी ओलसर माती खुरपणीसाठी सर्वात चांगली असते.

गवत किंवा तण मुळासकट न काढणे

अनेकजण फक्त वरवरचं गवत किंवा तण उपटून काढतात, पण त्यांची मुळं मातीतच राहतात. यामुळे काही दिवसांतच ते पुन्हा उगवतं आणि झाडाच्या वाटणीचं पोषण स्वतः शोषून घेतं. त्यामुळे नेहमी तण मुळासकट उपटून काढा आणि वेळोवेळी झाडांभोवती स्वच्छता ठेवा.

सतत खुरपणी करणे

गरजेपेक्षा जास्त खुरपणी केल्याने मातीची नैसर्गिक रचना बिघडते आणि मुळांना सतत त्रास होतो. महिन्यातून फक्त १-२ वेळाच हलकी खुरपणी करणं पुरेसं आहे. झाडाची गरज ओळखूनच माती सैल करा. खुरपणी झाल्यावर मातीत कंपोस्ट किंवा गांडूळ खत टाकल्यास झाडाला पोषण मिळतं आणि त्याची वाढ चांगली होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Milk Storage: फ्रिजमध्ये ठेवूनही दूध फाटतंय? मग हे सोपे उपाय करून बघा!
RO चं पाणी पिताय? सावधान! शरीरातील हाडं ठिसूळ आणि मिनरल्सची कमतरता होतेय का? वाचा डॉक्टरांचा काय आहे सल्ला