Hair Care : केसांना फाटे फुटण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? मग या ४ चुका टाळाच, आठवड्याभरात लगेच फरक दिसेल!

Published : Jun 15, 2026, 01:39 PM IST
Hair Care

सार

Hair Care : केसांना फाटे फुटण्याची (split ends) समस्या अनेकांना सतावते. केसांचं आरोग्य बिघडल्याचं हे पहिलं लक्षण आहे. पण काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

Hair Care : केसांना फाटे फुटले की केसांचा सगळा लुकच खराब होतो आणि केस हेल्दी दिसत नाहीत. जेव्हा केसांवर जास्त स्टाइलिंग केली जाते किंवा चुकीचा शाम्पू वापरला जातो, तेव्हा ही समस्या वेगाने वाढते. आपल्या केसांवर क्युटिकल नावाचं एक संरक्षक कवच असतं. केसांना नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टींमुळे हे कवच निघून जातं आणि केस दोन भागांमध्ये विभागले जातात. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळेही ते कोरडे होतात. चला तर मग जाणून घेऊया की केसांना फाटे फुटण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात.

केसांना जास्त उष्णतेपासून वाचवा

केसांवर सतत उष्णतेचा वापर केल्यास, जसं की स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग, केसांचं क्युटिकल डॅमेज होतं. त्यामुळे कोणतीही स्टाइल करण्याआधी केसांवर 'हीट प्रोटेक्ट सीरम' नक्की लावा. केस कमजोर असतील तर कमी तापमानावर स्टाइलिंग करा. ड्रायर वापरताना थंड हवेचा पर्याय निवडा. तसेच, उन्हात बाहेर जाताना केस स्कार्फ किंवा टोपीने झाका. असं केल्याने केसांना फाटे फुटण्यापासून वाचवता येतं.

केमिकलचा वापर टाळा

जर केसांवर जास्त केमिकल वापरले गेले, तर ते खराब होऊ लागतात. रिबॉन्डिंगपासून ते सतत कलर करण्यापर्यंतच्या प्रक्रियांमुळे ही समस्या वाढते. स्वस्त प्रोडक्ट्स वापरण्याच्या मोहात पडू नका, कारण त्यामुळे केसांचं जास्त नुकसान होऊ शकतं.

जास्त शॅम्पू वापरणं

जास्त सल्फेटमुळे फेस तयार होतो आणि केस स्वच्छ झाल्यासारखे वाटतात. पण जर तुम्ही आठवड्यातून ३ ते ५ वेळा शॅम्पू वापरत असाल, तर केसांमधील नैसर्गिक तेल (natural oil) निघून जातं. यामुळे केस कोरडे होतात आणि त्यांना फाटे फुटतात. त्यामुळे शॅम्पूचा वापर कमी करा आणि जास्त सल्फेट असलेले शाम्पू टाळा.

अल्कोहोलयुक्त शाम्पूपासून दूर राहा

काही जण जास्त अल्कोहोल असलेले शॅम्पू वापरतात, ज्यामुळे केसांमधील ओलावा हळूहळू कमी होतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही रिठा किंवा शिकाकाईसारखे नैसर्गिक घटक असलेले शॅम्पू वापरू शकता.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Somvati Amavasya : सोमवती अमावस्येच्या रात्री या ४ ठिकाणी लावा दिवा, पण मागे वळून पाहिल्यास...
ऑफिससाठी सिंपल आणि सोबर साड्या, पाहा ट्रेन्डी डिझाइन्स