बदलत्या वातावरणामुळे आजारी पडता? प्या हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे 10 ड्रिंक्स

Immunity Booster Drinks : शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन आणि मिनिरल्सची गरज असते. ग्रीन टी, लिंबू पाणीसह हळदीचे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Immunity Booster 10 Healthy Drinks : सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे बहुतांशणांना साथीचे आजार, सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे फार महत्वाचे असते. यासाठी व्हिटॅमिन ते मिनिरल्सयुक्त पेय पदार्थांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाऊ शकते. पाहूयात असे कोणते ड्रिंक्स आहेत ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारली जाऊ शकते.

ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दररोज लिंबाच्या रसासोबत ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

लिंबू पाणी
लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय उन्हाळ्याच्या दिवासात लिंबू पाण्याच्या सेवनाने शरिराला उर्जा मिळते.

हळदीचे दूध
हळदीमध्ये करक्यूमिन असते. याशिवाय हळदीतील अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्म असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह पचनासंबंधित समस्या दूर होतात.

आल्याची चहा
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय बद्धकोष्ठता, गॅस, उलटी, मळमळ अशी समस्या जाणवत असल्यास लिंबू-आल्याची चहा पिऊ शकता.

नारळाचे पाणी
नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनिरल्स असतात. यामुळे शरीर हाइड्रेट राहण्यासह रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

संत्र्याची स्मूदी
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.

एलोवेरा जेल
एलोवेरामध्ये व्हिटॅमिन, मिनिरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होण्यासह संपूर्ण आरोग्यास याचा फायदा होतो.

कलिंगडाचा ज्यूस
कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पाणी, व्हिटॅमिन ए आणि सी असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक मबजूत होण्यास मदत होते.

डाळिंबाचा ज्यूस
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह सूजेची समस्या कमी होते.

पुदिन्याचे पाणी
पुदिन्याचे पाणी किंवा चहा प्यायल्याने उत्तम झोप लागते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.

आणखी वाचा : 

आले आणि जिऱ्याची चहा पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी

सणासुदीच्या काळात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी अशी घ्या आरोग्याची काळजी

Share this article