Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी योगेश कदमांचा कडक इशारा

Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी योगेश कदमांचा कडक इशारा

Published : Oct 19, 2026, 07:05 PM IST

टायगर श्रॉफ प्रकरणावर मंत्री योगेश रामदास कदम यांनी मुंबईत गुंडगिरी आणि दहशत पसरवण्याचे प्रयत्न सरकार आणि मुंबई पोलीस सहन करणार नसल्याचा इशारा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री टायगर श्रॉफची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट केल्याचं कदम म्हणाले. परदेशातून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या टोळ्यांची कार्यपद्धती मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींच्या सुरक्षेचा धोका तपासून आवश्यक उपाययोजना केल्या जातील. टायगर श्रॉफसह इतर कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार आणि मुंबई पोलीस स्वीकारतील, असं आश्वासन त्यांनी दिलं. धमकी मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही केलं.