Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न! कालीघाटमधील धक्कादायक घटना

vivek panmand   | CMS
Published : Oct 13, 2026, 11:31 PM IST
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न! कालीघाटमधील धक्कादायक घटना

सार

तृणमूल खासदार दोला सेन यांनी आरोप केलाय की, एका महिलेने ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तन्निष्ठा साहा असं या महिलेचं नाव असून ती स्वतःला सिव्हिक व्हॉलेंटिअर आणि ममतांची भाची सांगत होती. ती ड्रग्जच्या नशेत असल्याचाही दावा सेन यांनी केलाय.

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घराबाहेर एक भयंकर घटना घडली आहे. त्यांच्यावर एका महिलेने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केलाय. तृणमूल खासदार दोला सेन यांनी सांगितलं की, एका महिलेने हातात चाकू घेऊन ममता बॅनर्जींवर (Mamata Banerjee) वार करण्याचा प्रयत्न केला. या महिलेने स्वतःची ओळख सिव्हिक व्हॉलेंटिअर म्हणून दिली आहे. तन्निष्ठा साहा असं या महिलेचं नाव असून ती ड्रग्जच्या नशेत होती, असा दावा दोला सेन यांनी केलाय. धक्कादायक म्हणजे, या महिलेने स्वतःला ममता बॅनर्जींची भाची असल्याचंही सांगितलं. घराच्या दारात उभं राहून तिने शिवीगाळ केली आणि त्यानंतर ती थेट रस्त्यावर झोपली. दोला सेन यांनी तातडीने कालीघाट पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न!

या घटनेनंतर दोला सेन यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटींवरून भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितलं की, घटनेनंतर तिथे उभ्या असलेल्या दोन पोलिसांना त्यांनी सगळा प्रकार सांगितला. पण त्यांनी आपण राज्य पोलीस दलाचे कर्मचारी असल्याचं सांगत, कोलकाता पोलिसांच्या हद्दीत आपण काहीही करू शकत नाही, असं उत्तर दिलं. पोलिसांवर आरोप करताना दोला सेन म्हणाल्या की, पोलिसांनी आरोपी महिलेला बाजूला नेऊन चहा पाजला. ममतांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी थेट सवाल केला, "माजी मुख्यमंत्र्यांनी जिवंत राहावं, असं विद्यमान मुख्यमंत्र्यांना वाटत नाही का?"

कालीघाटमधील धक्कादायक घटना

दुसरीकडे, राज्याचे उद्योगमंत्री तापस रॉय यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी हे माजी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत पूर्णपणे गंभीर आहेत. गेल्या १५ वर्षांत त्यांनी राज्यातील माता-भगिनी, सामान्य जनता आणि व्यापारी वर्गाला सुरक्षा दिली होती का? आता ते आरडाओरड करत आहेत! स्वतःचा काळ विसरले की काय!" मात्र, शुभेंदू अधिकारी या प्रकरणाची नक्कीच दखल घेतील आणि कारवाई करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Robinhood Stock: ट्रुइस्टने वाढवले टार्गेट, वॉल स्ट्रीटवरही चर्चा
Harsh Goenka: हर्ष गोयंकांनी शेअर केला वाळूत भाजलेल्या बटाट्यांचा व्हिडिओ, नेटकऱ्यांना आठवले जुने दिवस