
उत्तर प्रदेशातील एका तरुणाची बायको तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. याचा धक्का बसल्याने हा तरुण हरिद्वारला पोहोचला आणि तिथे थेट एका मोबाईल टॉवरवर चढला. मंगळवारी शिवालिक नगरमध्ये हा सगळा हाय-व्होल्टेज ड्रामा घडला. बायकोला समोर आणल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला. त्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
बायको सोडून गेल्याने हा तरुण खूपच तणावात होता. आपली बायको उत्तर प्रदेशातीलच एका दुसऱ्या तरुणासोबत पळून हरिद्वारला आल्याची माहिती त्याला मिळाली होती. तिचा शोध घेत तो हरिद्वारला आला. शिवालिक नगर भागात आल्यावर तो रागाच्या भरात एका उंच टॉवरवर चढला. स्थानिक लोकांनी त्याला टॉवरवर पाहिलं आणि लगेच पोलिसांना खबर दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण तो तरुण आपल्या भूमिकेवर ठाम होता. त्यामुळे पोलिसांचे सुरुवातीचे सगळे प्रयत्न फोल ठरले.
जोपर्यंत माझ्या बायकोला इथे आणत नाही, तोपर्यंत मी खाली येणार नाही, असा हट्ट त्याने धरला होता. त्याच्या या अजब मागणीमुळे पोलिसांची मोठी अडचण झाली. एकीकडे त्याला शांत ठेवायचं आणि दुसरीकडे त्याला खाली उतरण्यासाठी मनवायचं, अशी दुहेरी कसरत पोलिसांना करावी लागली.
पत्नी प्रेमी संग हुई फरार तो टावर पर चढ गया पति
हरिद्वार के शिवालिक नगर में एक युवक की पत्नी अपने प्रेमी संग फरार हो गई। जिससे नाराज होकर युवक टॉवर पर चढ़ गया और फिर पुलिस से अपनी पत्नी को बुलाने की मांग करने दगा। घटना के बाद मौके पर लोगों की भीड़ जुट गई। युवक को सुरक्षित नीचे उतारने के लिए पुलिस की कार्रवाई पर नजर बनी हुई है।
— Bhupi Panwar (@askbhupi) October 12, 2026
पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी त्याला खाली येण्यासाठी सतत समजावत होते. त्यांनी अनेकदा त्याला विनंती केली, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तरुण कित्येक तास त्या टॉवरवरच ठाण मांडून बसला होता.
संध्याकाळ उलटून रात्र झाली, तसा हा सगळा ड्रामा अचानक संपला. टॉवरवर अनेक तास घालवल्यानंतर, अंधार पडल्यावर तो तरुण स्वतःहून गुपचूप खाली उतरला. तो खाली आल्यावर पोलीस आणि स्थानिक लोकांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला.