Pregnancy Discrimination : मी प्रेग्नेंट आहे, मॅनेजरला मेसेज, ३ तासां नोकरी गेली

Published : Jul 17, 2026, 09:14 AM IST
Pregnancy Discrimination : मी प्रेग्नेंट आहे, मॅनेजरला मेसेज, ३ तासां नोकरी गेली

सार

प्रेग्नंसीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी कामावर क्रॅकर्स खाण्याची परवानगी मागितली, तर मॅनेजरने एका तरुणीला नोकरीवरूनच काढून टाकलं. धक्कादायक म्हणजे, मेसेज पाठवल्यानंतर अवघ्या तीन तासांत तिला कामावरून कमी केल्याचं पत्र मिळालं.

प्रेग्नंट असल्यामुळे कामाच्या वेळी थोडं अस्वस्थ वाटतंय, म्हणून मध्येच क्रॅकर्स खाण्याची परवानगी एका तरुणीने मॅनेजरकडे मागितली. पण त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. 'जिन' नावाच्या या तरुणीने आपला हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेग्नंसीमध्ये महिलांना अनेकदा मळमळ किंवा अशक्तपणा जाणवतो. यावर उपाय म्हणून कामाच्या ठिकाणी क्रॅकर्स खाण्याची परवानगी तिने मेसेज करून मागितली होती. पण हा मेसेज पाठवल्यानंतर अवघ्या ३ तासांत तिला नोकरीवरून काढून टाकल्याचं पत्र मिळालं!

जिनने तिच्या मॅनेजरला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर कंपनीकडून आलेलं कामावरून कमी केल्याचं पत्र, दोन्ही सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

तिने मॅनेजरला पाठवलेला मेसेज असा होता, 'मी उद्याच्या शिफ्टसाठी उत्सुक आहे. पण मला तुम्हाला एक वैयक्तिक गोष्ट सांगायची आहे. मी प्रेग्नंट आहे आणि त्यामुळे मला थोडा त्रास होतोय. मला सारखी भूक लागते आणि भूक लागल्यावर खूप अस्वस्थ वाटतं. त्यामुळे ड्युटीवर असताना खाण्यासाठी थोडे बिस्किटस आणले तर चालेल का?'

हा मेसेज पाठवून फक्त ३ तास झाले होते की, जिनला कंपनीकडून कामावरून काढून टाकल्याचा ईमेल आला. 'प्रोबेशन कालावधी यशस्वीरित्या पूर्ण न केल्यामुळे' तिला कामावरून काढत असल्याचं कंपनीने म्हटलं. २२ जुलै हा तिचा कामावरचा शेवटचा दिवस असेल आणि त्याआधीचा एक आठवडा नोटीस पिरीयड असेल, असंही पत्रात लिहिलं होतं. नोटीस पिरीयडचा पगार आणि इतर देणी दिली जातील, असंही कंपनीने स्पष्ट केलं.

यावर जिनने म्हटलं, 'मी त्या मॅनेजरवर विश्वास ठेवून हे सगळं सांगितलं होतं. मला घरी आधार द्यायला कुणी मोठं नाही. मॅनेजर माझी अडचण समजून घेईल असं वाटलं होतं, पण मी मूर्ख ठरले. आता मी नोटीस पिरीयडमध्ये कामावर जाणार नाही.'

अनेकांनी कमेंटमध्ये विचारलं की, कामावर साधं खाण्यासाठी परवानगी का मागावी लागली? यावर जिनने उत्तर दिलं, 'गेल्या आठवड्यात मॅनेजरने ग्रुपवर एक मेसेज टाकला होता. ६ तास काम केल्यानंतर मिळणाऱ्या २० मिनिटांच्या अनपेड ब्रेकशिवाय कुणीही काही खायचं नाही, असा तो नियम होता.

 मी ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करते, तिथूनच जेवण विकत घेऊन खाण्याची पद्धत आहे. पण त्यावरही कडक निर्बंध आल्याने, मी घाबरून आधीच परवानगी मागितली होती. दर २० मिनिटांनी एक क्रॅकर खाण्याची परवानगी मागितल्यामुळे त्यांनी मला काढून टाकलं.'

तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. 'ही तर क्रूरता आहे, याविरोधात कायदेशीर कारवाई करता येणार नाही का?' असं अनेकांनी विचारलं. तर काहींनी याला 'महिलांसोबतचा भेदभाव' म्हटलं आहे. 'आजही अनेक कंपन्या नुकतंच लग्न झालेल्या किंवा प्रेग्नंट महिलांना नोकरीवर ठेवायला टाळाटाळ करतात,' असंही काही युझर्सनी निदर्शनास आणून दिलं.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Chandrashekhar Bawankule | बिल्डरच्या बेकायदेशीर घराची नोंदणी नाहीच | unauthorized home
CJP Abhijeet Dipke | दीपकेंच्या दोन सहकाऱ्यांना 5 दिवसांची कोठडी