घरात साफसफाई करताना २० वर्ष जुनं SBI पासबुक सापडलं, रक्कम पाहून कुटुंबाला धक्का; नेमकं काय घडलं?

Published : Jul 16, 2026, 09:02 PM IST
SBI Passbook

सार

SBI Old Died Man Passbook : घरात साफसफाई करताना एका कुटुंबाला त्यांच्या मृत आजोबांचं SBI चं पासबुक सापडलं. त्या पासबुकमधील रक्कम पाहून संपूर्ण कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला.

नवी दिल्ली : घराची साफसफाई करताना अचानक अतिशय जुन्या गोष्टी, आठवणी सापडतात की एकाएकी संपूर्ण कुटुंबात आनंद निर्माण होतो किंवा एका क्षणात घरात, आयुष्यात सगळंच बदलतं. अशीच एक गोष्ट एका कुटुंबात घडली आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.

घरात साफसफाई करताना एका कुटुंबाला त्यांच्या मृत आजोबांचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक अतिशय जुनं पासबुक सापडलं. हे पासबुक जवळपास २० वर्ष जुनं होतं. पासबुक उघडल्यावर कुटुंबाला मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. पासबुकवरील आजोबांच्या बँक खात्यात असलेली रक्कम पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. महत्त्वाची बाब म्हणजे इतकी मोठी अमाऊंट पाहून कुटुंबाला आता ही रक्कम परत मिळवला येईल का हा प्रश्न पडला आहे. आजोबांच्या एका कुटुंबातील व्यक्तीने सोशल मीडियावर त्यांचं पासबुक शेअर करत हे जुन्या पासबुकमधील पैसे परत मिळतील का असा प्रश्नही विचारला आहे. त्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

 

 

सोशल मीडियावर पूजा नावाच्या एका महिलेने दिवंगत आजोबांच्या पासबुकचा फोटो शेअर केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, घराची साफसफाई करताना तिच्या कुटुंबातील एका सदस्याला आजोबांचं पासबुक सापडलं. माझ्या वडिलांनी ते पासबुक ओळखलं, की ते त्यांच्या वडिलांचं पासबुक आहे. हे असं आजोबांचं पासबुक किंवा बँक अकाऊंट होतं जे आम्ही सर्व पूर्णपणे विसरलं होतो.

पुढे तिने सांगितलंय, आजोबांच्या खात्यात १ लाखांहून अधिक रक्कम जमा आहे. २० वर्षांपूर्वी ही अतिशय मोठी रक्कम होती. त्या आता ही रक्कम अचानक दिसल्याने कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आजोबांचा मृत्यू आणि तब्बल २० वर्ष बँक अकाऊंट बंद असल्याने आता ते पैसे मिळणार का असा प्रश्न कुटुंबाला पडला आहे. याबाबत तरुणीने सोशल मीडियावर ही रक्कम आम्हाला मिळणार का असा प्रश्न विचारला आहे. त्यावर अनेकांनी बँक अकाऊंट अनेक वर्ष बंद राहिल्याने रद्द होत नाही, किंवा त्यातले पैसेही बुडत नाही असं अनेकांनी म्हटलं आहे. त्या बँक अकाऊंटचा कायदेशीर वारस बँकेची प्रक्रिया पूर्ण करुन त्या रकमेवर क्लेम करून ते पैसे मिळवू शकतात. यासाठी मृत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला आणि कायदेशीर वारस

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Chandrashekhar Bawankule | बिल्डरच्या बेकायदेशीर घराची नोंदणी नाहीच | unauthorized home
CJP Abhijeet Dipke | दीपकेंच्या दोन सहकाऱ्यांना 5 दिवसांची कोठडी